हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर नेहमीच आपल्याला दररोज दूध पिण्याचा सल्ला देतात. कारण दूध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अगदी लहान मुलं असो किंवा वृद्ध सगळ्यांनीच दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण त्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. परंतु या दुधाचे सेवनही नियमित प्रमाणात केले पाहिजे. अन्यथा जर तुम्ही जास्त सेवन केले, तर त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान देखील होऊ शकते.
दूध आपल्या शारीरिक वाढीसाठी आणि विकासासाठी चांगले असले, तरी देखील त्याचे सेवन मर्यादितच केले पाहिजे. ज्या लोकांना सर्दी, खोकला, अपचन, डायरिया स्किन डिसिज अशा प्रकारच्या समस्या आहेत. त्या लोकांनी दुधाचे सेवन करणे टाळावे. आता दररोज एका सामान्य व्यक्तीने किती दूध पिणे गरजेचे आहे? आपल्या शरीराला किती गरज असते? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
दररोज किती दूध प्यावे ?
एका निरोगी व्यक्तीने नियमितपणे दूध पिणे चांगले आहे. दुधातून शरीराला कॅल्शियम, विटामिन बी 12, विटामिन डी, कॅलरी, पोटॅशियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स देखील मिळतात. परंतु एका अभ्यासातून असे समोर आलेले आहे की, एका वयस्की व्यक्तीने दररोज तीन कप म्हणजे 750 मिली दूध प्यावे. त्याचप्रमाणे लहान मुलांनी 2.5 कप एवढे दूध प्यावे. हे प्रमाण व्यक्तीच्या शारीरिक गरजेनुसार कमी जास्त देखील होऊ शकते. परंतु सामान्यपणे रोज 500 मिली दूध आपल्या शरीरासाठी गरजेचे असते. त्यामुळे आपल्या शरीराला पुरेसे कॅल्शियम आणि विटामिन डी मिळते.
अति दुधाच्या सेवनाने काय नुकसान होते
स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार 3 कपापेक्षा जास्त दूध पिल्याने हीप फ्रॅक्चर, हाडांसंबंधी समस्या इतकेच नाही, तर अनेकवेळा जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे जास्त दूध पिल्याने हाडे जास्त मजबूत होतात. असा गैरसमज ठेवणे चुकीचे आहे. लहान मुलांनी जर जास्त दूध पिले तर दुधातील कॅलरीजमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि त्यामुळे मुलं जेवण करणे देखील टाळतात. तसेच जास्त दूध पिल्याने आयनचे प्रमाण देखील कमी होते.
अशाप्रकारे तुम्ही दररोज दूध पिणे गरजेचे आहे. परंतु साधारणपणे 500 मिली पेक्षा जास्त दूध जर तुम्ही दिवसाला पीत असाल, तर त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान देखील प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे सेवन योग्य प्रमाणात करणे, हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.