बंदी घातलेल्या चीनी ऍप Weibo मधून अचानक कसे गायब झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेसेज… 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने ५९ चीनी ऍपवर बंदी घातली आहे. त्यातील एक ऍप Weibo हे आहे ज्यावर पंतप्रधान मोदी यांचे अधिकृत अकॉउंट आहे. आज त्यांच्या या अकॉउंटवरील पोस्ट, फोटो आणि कमेंट अचानक गायब झाल्याने लोक आश्चर्यचकित आहेत. काही लोकांनी अंदाज लावला आहे की, चीनने ऍप बंदीच्या निर्णयाला उत्तर देत असे केले असावे मात्र हे सत्य नाही. पंतप्रधानांनी चीनी ऍपवर बंदी घातल्यावर Weibo सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांचे अकॉउंट डिलीट करण्याची प्रक्रिया सुरु झाली. Weibo वरून व्हीआयपी अकॉउंटस सोडण्याची प्रक्रिया फार जटिल असल्याने असे मेसेज हळूहळू नाहीसे होत आहेत.

चीनकडून अकॉउंट डिलीट करण्याची प्राथमिक परवानगी देण्यातही उशीर करण्यात आला. मोदींच्या Weibo अकाउंट वर एकूण ११५ पोस्ट होत्या. या सर्व पोस्ट मॅन्युअली डिलीट करण्याचा निर्णय झाला आई प्रक्रिया सुरु झाली. बऱ्याच प्रयत्नानंतर ११३ पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत. २ पोस्ट शिल्लक आहेत ज्यामध्ये शी जिनपिंग यांच्या सोबत मोदींचा फोटो आहे. चीनी नेत्यासोबतचे हे फोटो हटविणे कठीण असल्याकारणाने या पोस्ट राहिल्या आहेत. त्या पोस्टही लवकरच हटविण्यात येणार आहेत.

पोस्ट डिलीट करण्यास सुरुवात केली तेव्हा मोदींचे २४,४०० फॉलोअर्स होते. काही दिवसांपूर्वी चीनच्या प्रसिद्ध WeChat या ऍपमधून भारतीय दूतावासातील अधिकारीक अकॉउंटवरून तीन भारतीय विधाने डिलीट करण्यात आली आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी यांचे एक विधान होते. चीनच्या या अशा कृती आणि त्यांची ऍपसंदर्भातील सुरक्षा आणि गुप्तता यांसोबतची चिंता लक्षात घेऊनच भारत सरकारने TikTok, Weibo, Helo, WeChat सारख्या ५९ ऍपवर बंदी घातली आहे.

Leave a Comment