किंमत न वाढवता Parle G कसा कमवते नफा ??? 25 वर्षांपासून केली नाही दरवाढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिस्किटे हा आपल्या दररोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. बिस्किटे न खाणारा माणूस शोधूनही सापडणार नाही. जेव्हा कधी बिस्किटांबाबत चर्चा होते तेव्हा Parle G चे नाव प्रकर्षाने पुढे येते. भारताबरोबरच हे बिस्किट जगभरातही खूपच लोकप्रिय आहे. तसेच, Parle G हे भारतातील सर्वात जास्त खप होणारे बिस्किट देखील ठरले आहे. कमी किंमत आणि चांगली चव असलेले हे बिस्कीट आजही अनेक लोकं आवडीने खातात.
मात्र बदलत्या काळानुसार या बिस्किटांमध्ये अनेक बदलही झाले आहेत. असे असले तरीही त्याच्या चवीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यासोबतच आणखी एक अशी गोष्ट आहे कि, त्यामध्येही फारसा बदल झालेला नाही. तो बदल म्हणजे Parle G च्या छोट्या पॅकेटची किंमत. आता पाच रुपये किंमत असलेल्या या बिस्किटांची किंमत गेली अनेक वर्षे फक्त 4 रुपये होती. सतत वाढणारी महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस बदलत असताना पार्ले जी 5 रुपये दर कायम कसा ठेऊ शकली, हा एक मोठा प्रश्नच आहे.
अनेक वर्षांपासून दरवाढ नाही
Parle G च्या बिस्किटांना 82 वर्षांचा इतिहास आहे. हे जाणून घ्या कि, या कंपनीने 1994 पासून बिस्किटांच्या किंमतींमध्ये वाढ केलेली नाही. मात्र कोरोनाच्या साथीनंतर 2021 मध्ये कंपनीने यामध्ये 1 रुपयाने वाढ करत ते 5 रुपये केले. असे असुनही पार्ले जीच्या बिस्किटांची इतकी विक्री झाली की, यामुळे गेल्या 82 वर्षांचा विक्रम मोडला गेला. लॉकडाऊन दरम्यान, तर कंपनीचा एकूण बाजार हिस्सा सुमारे 5 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या तीन दशकात महागाई वाढली मात्र तरीही कंपनीने बिस्किटांच्या किंमतींत वाढ केलेली नाही. मात्र असे असूनही कंपनी नफा कमवत आहे.
कंपनी कसा कमावते नफा ???
इथे हे जाणून घ्या कि, आपले मार्जिन राखण्यासाठी कंपनीने दर वाढवण्याऐवजी बिस्किटांचा आकार कमी केला गेला. याआधी त्याच्या पॅकेटचे वजन 100 ग्रॅम होते. जे आता 92.5 ग्रॅम इतके कमी झाले आहे. गेल्या काही वर्षांत जसजशी महागाई वाढली तसतशी कंपनीने वजनही कमी केले. सध्या Parle G च्या पॅकेटचे वजन 55 ग्रॅम आहे. या तंत्राला ग्रेसफुल डिग्रेडेशन असे म्हंटले जाते. FMCG कंपन्यांकडून हे तंत्र अवलंबले जाते. यामध्ये किंमत वाढवण्याऐवजी उत्पादनाचे वजन कमी केले जाते. हळूहळू ग्राहकाला त्याची सवयही होते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.parleproducts.com/brands/parle-g
हे पण वाचा :
कोरोना नंतर आता देशात H3N2 विषाणूचा धोका, कर्नाटक-हरियाणामध्ये दोघांचा मृत्यू
Post Office च्या स्कीममध्ये मिळतोय बँकांमध्ये जास्त रिटर्न, अशा प्रकारे करा गुंतवणूक
तब्ब्ल 18 वर्षानंतर शेअर बाजारात दाखल होणार TATA Group च्या कंपनीचा IPO
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 50 लाख रुपये, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Railway स्थानकाच्या मागे लिहिलेल्या जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस सारख्या शब्दांचे अर्थ जाणून घ्या