प्रत्येक राशीनुसार व्यक्तींनी आहार कसा घ्यावा? एकदा हे वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यांच्या राशीनुसार बदल घडत असतो. राशींमध्ये होणारे बदल व्यक्तींच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडतात. जर एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सुरळीत चालू असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात ग्रहांचा संयोग जुळून आल्याचे म्हटले जाते. परंतु या सगळ्यात प्रत्येक एका व्यक्तीने आपली रास जाणून आहार देखील तसाच द्यायला हवा. योग्य आहारामुळे देखील आरोग्य चांगले राहतेच परंतु इतर ही सकारात्मक बदल घडतात.

राशीनुसार आहार कसा घ्यावा

वृषभ- या राशीतील व्यक्तींनी निरोगी राहण्यासाठी फळे, पालेभाज्या, लिंबू आणि जास्त पाण्याचे सेवन करावे तेलकट चमचमीत पदार्थ खाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम जाणवू शकतो.

मिथुन- रात्रीचे जेवण कमी आणि हलके खावे. नेहमी चांगले आणि हिरव्या भाज्या खाव्या.

कर्क- दारू मांस अशा कोणत्याही गोष्टीचे सेवन करू नये, तसेच दूध, दही, लिंबू, सुकामेवा अशा गोष्टींचे सेवन जास्त करावे.

सिंह- नेहमी चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. भोजनामध्ये शाकाहारी भोजन घ्यावे, फळे सुकामेवा अशा गोष्टी आहारात घ्याव्यात.

कन्या – आहारामध्ये दूध, फळे, भाज्या पचायला हलके असणारे अन्नपदार्थ घ्यावे. औषधांसाठी सेवन करू नये.

तूळ- अति गोड किंवा आती आंबट पदार्थ खाऊ नयेत, सात्विक आहार आहार घ्यावा.

वृश्चिक- दूध, फळे, भाजीपाला यांचे सेवन करावे. अंजीर, कांदा, लसूण अशा गोष्टी खाणे टाळावे. मास व दारू वर्ज करावे.

धनु- सर्व युक्त पदार्थांचे सेवन टाळावे. रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली अवश्य करावे. जास्त तेलकट तुपकट खाऊ नये.

मकर- गुडघ्यांचे आजार सतावत असल्यास पालक, फळे, काकडी, हिरव्या भाज्या खाव्यात. हलका व्यायाम देखील करावा.

कुंभ- दूध, दही, पनीर, सॅलड गाजर अशा गोष्टी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्याव्यात.

मीन – आंबट, गोड, चरबीयुक्त अन्नपदार्थ, खाणे टाळावे. घरचे ताजे अन्न जेवावे.

कोणत्याही राशीतील व्यक्तीने जेवणा अगोदर पाणी घेऊ नये. जेवण झाल्यानंतर देखील जास्त पाण्याचे सेवन करू नये.