हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध योजना केल्या आहेत. त्यातील रेशन कार्ड योजना ही खूप लोकप्रिय योजना आहे. भारतातील जवळपास सगळ्याच कुटुंबांकडे रेशन कार्ड असते. या रेशन कार्डवर कुटुंबातील सगळ्या सदस्यांची नावे असतात. आणि या सदस्यांच्या नावावरच आपल्याला अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. रेशन कार्डच्या मदतीने तुम्हाला मोफत रेशन मिळते. यामध्ये तुम्हाला सरकार मार्फत गहू, तांदूळ, तेल, डाळ यांसारखे जीवनावश्यक वस्तू मिळतात. त्यामुळे रेशन कार्डमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे नाव असणे खूप गरजेचे असते. अगदी नवजात बालक असेल किंवा नवविवाहित स्त्री असेल तरी रेशन कार्डमध्ये त्या व्यक्तीचे नाव जोडणे गरजेचे असते. आता नवीन सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये कसे जोडायचे?हे आज आपण जाणून घेणार आहोत.
ऑनलाईन पद्धतीने करा काम?
तुम्हाला जर तुमच्या रेशन कार्डवर कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडायचे असेल, तर यासाठी आधीपासून तयार केलेले रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. तसेच जर तुम्हाला नवीन मुलाचे नाव जोडायचे असेल, तर त्यासाठी त्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र तसेच पालकाच्या आधार कार्ड गरजेचे असते. जर एखादी नवविवाहित महिला असेल, तर तिचे आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र आणि तिच्या पालकांचे रेशन कार्ड आवश्यक असते.
या सगळ्याच्या मदतीने तुम्ही रेशन कार्ड वर कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडू शकता. यासाठी अत्यंत सोप्पी प्रोसेस आहे. यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही. तुम्हाला राज्याच्या अन्नपुरवठ्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. आणि तिथे तुम्ही रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी अर्ज करू शकता.
रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्याची प्रोसेस
- सगळ्यात आधी तुम्हाला राज्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लॉगिन आयडी तयार करा आणि लॉगिन करा.
- या वेबसाईटवर तुम्हाला नवीन सदस्य जोडण्याचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल.
- त्या फॉर्ममध्ये नवीन सदस्याचे नाव आणि इतर डिटेल्स धरा.
- तसेच आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.
- सगळं झाल्यावर तुमचा फॉर्म सबमिट करा.
- तुमचा फॉर्म सबबिट केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
- त्यानंतर ह्या या फॉर्मला ट्रॅक करण्यासाठी तुम्ही फार रजिस्ट्रेशन नंबर वापरू शकता.
- तुमचा फॉर्म आणि सगळ्या कागदपत्राची छाननी केली जाईल.
- सगळे माहिती जर बरोबर असेल तर नवीन सदस्याचे नाव तुमच्या रेशन कार्डस वर जोडले जाईल.