हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान आंतरराज्यात प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा याविषयी माहिती असणं आवश्यक आहे.
ई-पास कसा काढायचा?
ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तेथील ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला पुढे ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा लागले.
त्याचबरोबर यावेळी आवश्यक कागदपत्र येथे जोडावी लागतील.
प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावे लागणार आहे.
कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे, याची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती तपासता येईल.
पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई-पास डाऊनलोड करु शकता.
या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगावी लागेल. जेणेकरुन पोलिसांनी विचारले असता, त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.
आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात येत आहे.
आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: https://t.co/c2fxPS3Qzv
अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.
पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.#EPassForTravel
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 23, 2021
कोणाला मिळू शकतो इ -पास
राज्य आणि केंद्र सरकारच्या यादीतील अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्यांना आंतर जिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी ई-पास आवश्यक नाही
या पाससाठी कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह अर्ज करु शकतो.
अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.