आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

Tokenization of cards
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Credit Card चा वापर वाढतच चालला आहे. कोरोना नंतर तर लोकं रोखीने व्यवहार करण्याऐवजी क्रेडिट कार्ड वापरण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र कधी विचार आहे का कि आपले क्रेडिट कार्ड कुठेतरी हरवले तर… किती मोठा त्रास होऊ शकेल. जर आपण ICICI क्रेडिट कार्डचे ग्राहक असाल तर आपले हरवलेले क्रेडिट कार्ड कसे ब्लॉक करता येईल हे जाणून घ्या…

ICICI achieved a milestone: issued two million Amazon Pay ICICI Bank credit  cards

कस्टमर केअर नंबरद्वारे-

ICICI बँकेच्या कस्टमर केअर नंबर – 1860 120 7777 वर कॉल करून आपले Credit Card ब्लॉक करता येईल.

नेट बँकिंगद्वारे-

त्यासाठी ICICI च्या  https://www.icicibank.com/ या वेबसाईटवर जा. आता Login वर क्लिक करा. यूझर आयडी आणि पासवर्ड टाका. यानंतर क्रेडिट कार्ड विभागात जा. पुढील पेज वर Credit Card ब्लॉक करण्याचा पर्याय दिसेल.

 

ICICI Bank HPCL Coral Credit Card Review – CardExpert

iMobile App द्वारे-

यासाठी ICICI बँकेच्या iMobile App मध्ये, Services वर क्लिक करावे लागेल, आता Card Services पर्यायावर क्लिक करा. यानंतर ब्लॉक Credit Card सिलेक्ट करा. पुढील स्क्रीनवर कार्ड प्रकार आणि कार्ड नंबर निवडावा लागेल. आता Submit वर क्लिक करा. कार्ड त्वरित ब्लॉक केले जाईल.

जवळच्या शाखेद्वारे-

आपले हरवलेले क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी आपल्याला ICICI बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन विनंती करता येईल.

ICICI Bank Coral Credit Card Review - Card Maven

कॉन्टॅक्टलेस कार्डने 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी पिन द्यावेळी लागत नाही

हे लक्षात घ्या की, कॉन्टॅक्टलेस तंत्रज्ञान असलेल्या कार्डद्वारे ‘टॅप अँड पे’ ची सुविधा मिळते. म्हणजेच कार्ड स्वाइप न करता POS मशीनवर फक्त टॅप करून पेमेंट करता येते. कॉन्टॅक्टलेस कार्डने पिन न टाकता 5000 रुपयांपर्यंत पैसे देता येईल.

हे पण वाचा :

Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!

James Anderson ने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध पूर्ण केले बळींचे शतक !!!

ICICI Bank कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये केली 20 बेसिस पॉईंटची वाढ