How to check adulteration in salt | तुम्हीही भेसळयुक्त मीठ खात असाल तर थांबा ! अशाप्रकारे करा शुद्ध मिठाची पारख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

How to check adulteration in salt | आज-काल सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ वाढत चाललेली आहे. शुद्ध अन्न मिळणे देखील देखील खूप अवघड होऊन बसलेले आहे. त्यामुळे आजकाल निरोगी जीवन जगणे हे सगळ्यांसाठी एक मोठे आव्हान आहे. भेसळ केल्यामुळे त्या विक्रेत्याला चांगला फायदा होत असेल, परंतु ग्राहकाला मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आज काल मसाल्यापासून चहा पाण्यापर्यंत तसेच बिस्किटे, घरात वापरलेल्या गोष्टींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भेसळ झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का? की तुम्ही स्वयंपाक घरात जे मीठ वापरता त्या मिठात देखील मोठ्या प्रमाणात भेसळ(How to check adulteration in salt) झालेली असते.

आता हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. तुम्ही असे म्हणाल की. मीठ हे चवीला खरात असते ते दिसायला पण सारखंच असतं. परंतु असे नाही अनेकवेळा या मिठामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. त्यामुळे आपल्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. आता योग्य मीठ कसे ओळखायचे? हे जर माहीत नसेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आज आपण योग्य मीठ कसे ओळखायचे हे सांगणार आहोत.त्याआधी आपण भेसळयुक्त मिठाने काही समस्या होऊ शकतात हे जाणून घेऊया.

भेसळयुक्त मीठ खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. भेसळयुक्त मिठाने यकृताचे आजार देखील वाढतात. त्याचप्रमाणे तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो, पोटात जळजळ आणि वेदना निर्माण होतात. त्याचप्रमाणे भेसळयुक्त मीठ खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात गॅस निर्माण होतो आणि यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे हे मीठ मेंदू आणि किडनीला देखील हानिकारक असते. त्यामुळे तुम्हाला मुतखडा होऊ शकतो. हे मीठ खाल्ल्याने तुम्हाला अनेक समस्या निर्माण होतात.

भेसळयुक्त मीठ कसे ओळखायचे ? | How to check adulteration in salt

तुम्ही एक कापूस घेऊन हे भेसळयुक्त मीठ तपासू शकता. यासाठी एका भांड्यात थोडे पाणी घ्या आणि त्यात एक ते दोन चमचे मीठ घाला. आता कापसाचा गोळा आणि कापसाचा तुकडा पाणी यांचे मिश्रण एकत्र करा. जर हे मीठ भेसळयुक्त असेल तर त्या कापसाचा रंग बदलायला लागतो. अशाप्रकारे तुम्ही मीठ भेसळयुक्त आहे की नाही ते तपासू शकता.