कान घरगुती पध्दतीने कसे साफ करू शकता, जाणून घेऊया त्याबद्दल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। कानाच्या समस्या निर्माण झाल्या म्हणजे खूप त्रासदायक असते. कारण कानाचे दुखणे हे डोके , कान, मेंदू आणिदाढ या सगळ्या भागांवर दुखणे सुरू होते. कानातील कोणत्याही प्रकारची खाण काढताना खूप काळजी घेतली पाहिजे. कोणत्या प्रकारची काळजी कानासाठी घेतली पाहिजे. हे जाणून घेऊया…

आपण आंघोळ करताना आपले शरीर दररोज स्वच्छ करत असतो, परंतु आपल्या शरीराचे असे काही भाग आहेत जे आपल्यासाठी स्वच्छ करणे फार कठीण जाते. कानांसारखे शरीराचे छोटे भाग स्वच्छ करणे फार कठीण आहे. बरेच लोक कित्येक वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने कान स्वच्छ करतात.

कानातील मळ बाहेर काढण्यासाठी दुसरी पद्धत पण खूप सोपी अशी आहे. आधी अर्धा कप गरम पाणी घ्यावे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ मिसळावे. नंतर त्या मिश्रणात कापसाचा तुकडा भिजवा आणि कापसाच्या बोळ्याने कानात पाणी पिळून टाका.परंतु लक्षात ठेवा की पाणी चांगले आत गेले पाहिजे. आणि नंतर कान उलटा करा आणि त्यातून सर्व पाणी बाहेर काढा.

तिसऱ्या पद्धती मध्ये हायड्रोजन पेरोक्साईड या द्रव्य पदार्थ आणि पाण्याचे थेंब समान प्रमाणात घ्या आणि ते कानात घाला. ते कानात व्यवस्थित टाकल्यानंतर काही वेळ कान स्तिर ठेवा. नंतर थोड्या वेळाने कान फिरउन कानातले टाकलेले मिश्रण बाहेर येऊद्या. म्हणजे पाणी बाहेर येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment