टीम, HELLO महाराष्ट्र । म्हैसूर पाक घराच्या घरी बनवण्यासाठी लागणार साहित्य प्रथम पाहुयात ,
साहित्य :
३ लहान वाटय़ा ताजे बेसन, ३ वाटय़ा साखर, ५ वाटय़ा तूप, वेलदोडे पूड अर्धा चमचा, थोडे बदाम काप
कृती :
२ मोठा चमचा तूप डाळीच्या पिठाला चोळा आणि मंद गॅसवर थोडे भाजून घ्या. दुसरीकडे २ वाटय़ा पाणी व ३ वाटय़ा साखरेचा पाक करा. त्यात भाजलेले बेसन घाला व घोटा. दुसऱ्या गॅसवर तूप गरम करत ठेवा. दर २ मिनिटांनी ३ मोठे चमचे गरम तूप बेसनात घालत राहा. साधारण १ वाटी तूप उरेपर्यंत तूप घालून हलवत राहा. बेसनाचे मिश्रण चौकोनी ट्रेमध्ये घालून हलवा. म्हणजे सगळीकडे सारखे पसरेल. आता पातेल्यात उरलेले १ वाटी गरम तूप पूर्ण म्हैसूरपाकावर ओता, असे केल्याने जाळी छान पडते.