हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : आर्थिक नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. आपल्याला भविष्यात किती आणि कधी पैशांची गरज भासेल हे आत्तापासून जाणून घेणे फार महत्वाचे आहे. प्रत्येकाला आपल्या मुलांना चांगले भविष्य द्यायचे असते त्यासाठी प्रत्येकजण काही ना काही तरतूद करत असतोच. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि इतर खर्चासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे गुंतवणूक करतो. मात्र प्रत्येकाला हे जमेलच असे नाही .
गुंतवणुकीचे योग्य धोरण नसल्यामुळे किंवा योग्य वेळी गुंतवणूक सुरू न केल्यामुळे असे घडते. तसेच बऱ्याचदा अशा ठिकाणी पैसे गुंतवले जातात जिथून चांगला रिटर्नही मिळत नाही आणि ज्यामुळे आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येत नाही. चला तर मग आपल्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी ते समजून घेउयात …
लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा
मुलांच्या भविष्यासाठी जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा मिळेल. म्हणजेच जर मुलाच्या जन्मानंतर लगेचच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्याच्या 18 वर्षांपर्यंत भरपूर पैसे जमा होतील. त्यामुळे मुलांसाठी फंड तयार करण्यासाठी गुंतवणूक करण्यात आळशीपणा करू नका. Investment
योग्य ठिकाणी गुंतवणुक करा
आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे केव्हाही महत्त्वाचे असते. ज्यामुळे जे सुरक्षित असेल आणि चांगला रिटर्नही मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करावी. बाजारात सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम, LIC ची जीवन तरुण प्लॅन, चाइल्ड इन्शुरन्स प्लॅन आणि म्युच्युअल फंड सारखे अनेक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत, जे भविष्यासाठी एक मोठा फंड तयार करण्यात खूप उपयुक्त आहेत. रिटर्न आणि कालावधी लक्षात घेता इक्विटी म्युच्युअल फंड देखील एक चांगला पर्याय ठरू शकेल. Investment
गुंतवणुकीत सातत्य
आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पैसे जमवायचे असतील तर आर्थिक शिस्त आणावी लागेल. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. त्यासाठी चांगले नियोजन आणि सातत्याने गुंतवणूक करावी लागेल. कोणतीही गुंतवणूक केली तरीही त्यामध्ये सातत्य राखणे महत्वाचे ठरेल. Investment
मालमत्ता वितरणात सावधगिरी बाळगा
आपल्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य असणे महत्त्वाचे आहे. यामुळे एका गुंतवणुकीतून किंवा बचत योजनेतून कमी रिटर्न मिळाला तरी त्याची भरपाई इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून झाली पाहिजे. तसेच वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये आपल्या गुंतवणुकीचे विभाजन केल्याने पोर्टफोलिओमध्ये बॅलन्स राहील. हे लक्षात घ्या कि, मुलांबरोबरच स्वत:च्या भविष्यासाठीही गुंतवणूक करावी. किमान आपला इन्शुरन्स प्लॅन देखील असावा. Investment
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :
हे पण वाचा :
Credit Card चे लिमिट वाढवण्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या
आता नॉन-ब्रँडेड तांदूळ अन् मैद्यावरही द्यावा लागणार 5 टक्के GST
Income Tax Return भरण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत??? समजून घ्या
अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4 वर्षात दिला 17 पट नफा !!!
New Labour Codes : 1 वर्ष काम करूनही ग्रॅच्युइटी मिळेल का ???