हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंस्टाग्राम हे एक अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील अनेक तरुण- तरुणी इंस्टाग्रामचा वापर करत आहेत. याशिवाय, अनेक बॉलीवूड कलाकार, क्रिकेटपटू यांसारखे दिग्गज आणि प्रसिद्ध लोक सुद्धा इंस्टाग्रामवर आपल्या पोस्ट्स शेअर करत असतात. आपले अकाउंट अजून चांगलं ठेवण्यासाठी कंपनी इंस्टाग्राम ब्लू टिक घेण्याची परवानगी देखील देते. मात्र यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. येथे आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामवर ब्लू टिक कसे मिळवायचे त्याबाबत माहिती सांगणार आहोत.
इंस्टाग्रामवर प्रसिद्ध लोक किंवा काही ठराविक यूजर्सना ब्लु टिक दिली जाते. यूजर्सच्या नावापुढे ब्लु टिक लागल्याने सदर अकाउंट हे ओरिजिनल आहे आणि इंस्टाग्रामने सुद्धा ते कन्फर्म केलं आहे हे स्पष्ट होते. आपल्या अकॉउंटचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र देखील सब्मिट करावे लागेल. जर तुमच्याकडे बिझनेस प्रोफाईल असेल तर तुम्हाला बिझनेसशी संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतील.
इंस्टाग्रामवर ब्ल्यू टिकसाठी केलेला अर्जही अनेकदा फेटाळला सुद्धा जाऊ जातो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमचे खाते पूर्ण केल्याची खात्री करा. त्यानंतर ब्लू टिकसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अकाउंट सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनच्या ऑप्शन वर क्लीक करा. येथे सर्व डिटेल्स दिल्यानंतर, तुम्हाला जी काही कागदपत्रे आवश्यक आहेत ती जमा करावी लागतील. वेरिफिकेशन रिक्वेस्ट केल्यांनतर काहीवेळ तुम्हाला वाट पाहावी लागेल. कंपनीकडून तुम्हाला नोटिफिकेशन आणि मेल येईल. अकाउंट वेरिफाइड झाल्यांनतर तुमच्या नावापुढे ब्लु टिक दिसेल.