घरातील धान्यांना सोंडे किंवा किडे लागले तर; डब्यात ठेवा ‘या’ घरगुती गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळीच्या आधी सगळेजण घरातील साफसफाई करत असतात. तसेच स्वच्छतेसोबत सगळा किराणा देखील भरून ठेवत असतात. कारण दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. यादरम्यान गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य वेगवेगळे पदार्थ डब्यांमध्ये भरून ठेवतात. परंतु या धान्यांना सोंडे लागणे किंवा कीड लागणे ही समस्या सगळ्यांनाच येते. धान्याला जास्त सोंडे लागल्याने अनेक वेळा हे धान्य फेकून द्यावे लागते. परंतु या धान्याला सोंडे किंवा कीड लागू नये. यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येतील. आज आम्ही तुम्हाला या धान्यांना सोंडे लागू नये, यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

धान्यांमध्ये कडुलिंबाची वाळलेली पाने टाका

डाळी तसेच तांदळाला किडे आणि सोंडे लागू नये, यासाठी तुम्ही तांदूळ आणि डाळीच्या डब्यामध्ये कडुलिंबाची वाढलेली पाने ठेवू शकता. कडुलिंबाच्या पानाच्या वासाने कीटक बाहेर जातात. आणि तुमचे धान्य सुरक्षित राहते. परंतु कडीलिंबाची ही पाने पूर्णपणे वाळलेली असावी, तरच त्याचा फायदा होतो.

काळी मिरी

काळी मिरी ही खडे मसाल्यांतील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. काळी मिरीला उग्र वास असतो. जर तुम्ही तुमच्या धान्यांच्या डब्यामध्ये काळी मिरी टाकली, तर सोंडे आणि कीटक हे पळून जातील. यासाठी तुम्ही काळी मिरी ही एकाद्या कपड्यांमध्ये बांधून ठेवून धान्याच्या डब्यामध्ये टाकू शकता.

काडेपेटी

काडेपेटी देखील ही कीटक पळून लावण्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण या काडेपेटीमध्ये सल्फर असते. ज्यामुळे कीटक येत नाही तुम्ही एका कपड्यात बांधून ही काडेपेटी धान्यांच्या डब्यात ठेवली तर सोंडे किंवा किडे निघून जातील.

अशाप्रकारे तुम्ही वरील सगळ्या पर्यायांचा वापर करून घरातील धान्य साठवू शकता. यामुळे तुमचे धान्य खराब देखील होणार नाही. आणि घरच्या उपायांनी सोंडे निघून जातील. यासाठी तुम्हाला कोणताही रासायनिक पावडरचा वापर करण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी या पद्धतीचा वापर करून धान्यातील सोंडे किंवा कीटक पळून लावू शकता.