आरोग्यमंत्रा – आपला दिवस आनंदी आणि चांगला जावं असं प्रत्तेकालाच वाटत असते. तुमच्या दिवसाची सुरवात चांगली झाली तर नक्कीच तो दिवस तुम्हाला आंनदी जातो. दिवसभरात काय काय होणार आहे हे जरी अापल्या हातात नसले तरी दिवसाची सुरवात आपण कशी करायची हे आपल्या हातात असते. खालील गोष्टींनी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरवात केली तर नक्कीच तुमचा दिवस आनंदात जाईल
१) लवकर उठणे – सकाळी लवकर उठल्याने आपल्याला कामासाठी जास्त वेळ मिळतो. त्यामुळे कामे वेळेत होतात आणि कामाच्या ताणामुळे होणारी चिडचीड टळते.
२) व्यायाम करणे – रोज सकाळी थोडावेळ व्यायाम केल्याने शरिर सद्रुढ बनते. व्यायामाने दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी मिळते.
३) ध्यान – सकाळच्या वेळी डोळे मिटून ध्यान केल्यामे मनाला शांतता मिळते. ध्यानामुळे चिडचिडपणा कमी होतो आणि एकाग्रता वाढते.
४) पौष्टीक नाष्टा – सकाळची न्याहारी पौष्टीक असेल तर दिवसभराच्या कामाला योग्य ती उर्जा मिळते.
५) कामाची यादी – दिवसभर कोणकोणती कामे करावयाची आहेत त्याची एखादी यादी करता आली तर त्याचा चांगला फायदा होतो. कामाच्या नियोजनामुळे कामे वेळेवर होतात.