जमिनीच्या मशागतीसाठी उपयुक्त रोटावेटरची देखभाल कसे करायचे जाणून घेऊया 

Rotavater
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली सर्वच क्षेत्रात बऱ्याचशा कामांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचे बरीचशी कामे यंत्राच्या साह्याने केले जातात. काही यंत्र बैलचलीत काही स्वयंचलित आणि ट्रॅक्‍टरचलित यंत्रांचा यामध्ये समावेश आहे.  ट्रॅक्टर चलीत यंत्रांमध्ये रोटावेटर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. जमिनीची नांगरट केल्यानंतर निघालेली ढेकूळ फोडण्यासाठी रोटावेटरचा वापर होतो हे सर्वांनाच ज्ञात आहे. रोटावेटरचा वापर केल्याने जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते.याचा उपयोग बऱ्याचदा केला जातो मात्र त्याची देखभाल केली जात नाही , आज रोटावेटरच्या देखभालीसंदर्भात जाणून घेऊया.

रोटावेटरच्या सर्व फिरणाऱ्या भागांना वंगण द्यावे व सर्वे ग्रीसिंग पॉईंट्स ग्रीस लावावे. गिअर बॉक्समधील वंगन ऑइलची पातळी तपासावी आणि ते कमी असल्यास त्यात योग्य ग्रेडचे ऑइल घालावे. ऑइल  संपले असल्यास ते बदलावे. रोटावेटरची पाती सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पाती वाकडी किंवा मोडली असल्यास गरजेनुसार ती बदलावीत किंवा दुरुस्त करावी. चेन पॉकेट व चेन केसमधील तेल तपासावे आणि साडेचारशे तास वापरल्यावर तेल बदलावे. चेनचा ताण योग्य स्थितीत ठेवावा. रोटावेटर वापरण्यापूर्वी त्याची सर्व नट बोल्ट घट्ट आवळावीत.

रोटावेटरचा वापर करण्यापूर्वी काही प्राथमिक तपासण्या करून घ्याव्यात. जसे की, पोलादी पाते व मुख्य चौकटीचे नट बोल्ट तपासून घट्ट करावेत. गिअर बॉक्समधील तेलाची पातळी तपासून आवश्यक असल्यास तेल टाकावे. तेल टाकीच्या तळाशी असलेल्या लेव्हल काठीच्या साह्याने तपासून ऑइलची पातळी योग्य प्रमाणात तपासून तेलाची पातळी योग्य प्रमाणात ठेवावी ठेवावी.  नेहमी पुरेशी अतिरिक्त पाती व शिफारस केलेले नट बोल्ट ट्रॅक्टर सोबत दिलेल्या अवजारांच्या पेटीत आहेत याची खात्री करून घ्यावी. रोटावेटर ट्रॅक्टरला जोडताना सर्व लिंक्स व्यवस्थित जोडल्या गेल्या आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी.

तसेच प्रत्यक्ष शेतात काम सुरू असतानाही काही काळजी घ्यावी  लागते. रोटावेटर शेतात वापरताना अथवा वाहतुकीच्या वेळी तो १० ते १५ सेंटिमीटर पेक्षा सहसा जास्त उचलू नये.कारण पीटीओ शाफ्ट व कार्डेन शाफ्ट यामधील कोण ती संशोधनपेक्षा जास्त असता कामा नये. पात्यांचा फिरण्याचा वेग पीटीओच्या वेगावर आधारित असल्याने एक्सलेटर वाढवून तो आवश्यक तेवढा ठेवावा. माती कोरडी व काहीशी टणक असेल तर मात्र पहिल्या लो गियरमध्ये ट्रॅक्टर चालवावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’