सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं राम मंदिराचं श्रेय, मोदींबाबत केलं ‘हे’ धक्कादायक विधान

नवी दिल्ली ।  अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या योगदानावरून मोदींवर निशाणा साधला आहे.

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात असं कोणतही काम केलेलं नाही, असं सांगत स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना राम मंदिराचं श्रेय दिलं आहे. टीव्ही ९ भारतवर्ष वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

“पंतप्रधानांचं यामध्ये कोणतंही योगदान नाही. राम मंदिर प्रकरणात सर्व चर्चा आम्ही लोकांनी केली आहे. सरकारच्या वतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, जे मला माहिती आहे किंवा ज्यामुळे म्हणू शकतो की, निर्णय आला. मूळात ज्यांनी यात काम केलं आहे, त्यांचं मी नावं घेतलं आहे. यात पहिलं नावं राजीव गांधी यांचं आहे,” असं स्वामी म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like