हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र वातावरण देखील थंड होते. आणि हिरवागार निसर्ग आपल्याला दिसतो. त्यामुळे अनेक लोक हे धबधब्याच्या ठिकाणी त्याचप्रमाणे डोगरदाऱ्यांमध्ये फिरायला जातात. यावर्षी देखील पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परंतु वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. नुकत्याच लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एका कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना आली. त्यानंतर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आलेली आहे. यासंबंधी एक व्हिडिओ पुणे आयएमडी प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी शेअर केलेला आहे. यामध्ये त्यांनी तुम्ही जर पाण्यामध्ये बुडाला तर स्वतःचा बचाव कसा करायचा? याबाबतची ट्रिक त्यांनी सांगितलेली आहे.
होसाळीकर यांनी सांगितले की, अचानक जर पाण्याचा प्रवाह आला तर पाण्यात अडकलेल्या लोकांनी पाण्याचा वाट पाहण्यात आडवे उभे राहण्यापेक्षा एकापाठी एक उभे रहावे आणि एकमेकांना घट्ट पकडून उभे राहावे. अशावेळी पाण्याच्या प्रवाहाला विरोध होत नाही. चीनमध्ये पाण्यापासून बचाव करण्यासाठी प्रशिक्षणात हा भाग शिकवला गेल्याचे होसाळीकर यांनी सांगितलेले आहे.
होसाळीकर काय म्हणाले ?
होसाळीकर यांनी सांगितले की, “जर वाहत्या पाण्यामध्ये समूहाने तुम्ही अडकला तर स्वतःचा जीव व इतरांचा जीव कसा वाचू शकतो? हे चायनामध्ये दिलेल्या ट्रेनिंग प्रशिक्षण व्हिडिओ पहा फॉरवर्ड करायचे मी करून कोणालाही त्याचा उपयोग होईल.”
भुशी डॅम येथील दुःखद घटना
लोणावळ्यातील भुशी डॅम येथे काही दिवसापूर्वी एक विचित्र घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण पाण्यात वाहून गेले. यामध्ये चार लहान मुले आणि एका महिलांचा समावेश होता. ते पुण्यातील रहिवाशी होते. हे लोक भुशी धरणाच्या पाठीमागे असलेला डोंगरातील वॉटर फॉलचा आनंद घेण्यासाठी गेले होते. परंतु अन्सारी कुटुंबातील पाच जण या पाण्याच्या प्रवाहात 30 जून रोजी पाय घसरून वाहून गेले. या घटनेनंतर प्रशासनाने अनेक नियम बनवलेले आहेत.