How To Stay Healthy In Summer | उन्हाळ्यात निरोगी आणि ताजेतवाने राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स, वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

How To Stay Healthy In Summer | हळूहळू उन्हाचा तडाका वाढायला लागलेला आहे. घरात बसून देखील मोठ्या प्रमाणात गर्मी होताना दिसत आहे. या ऋतूमध्ये आजाराचे प्रमाण देखील अधिक वाढते. तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे अनेक समस्या होतात. यावेळी ऋतूमध्ये फ्लूस, व्हायरल सर्दी, खोकला यांसारखे आजार होतात. तसेच सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे डीहायड्रेशनचा देखील समस्या येतात. त्यामुळे या ऋतूत स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यात तुम्ही स्वतःची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे, याची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

सकाळी नाष्टा करूनच बाहेर पडा

उन्हाळ्यामध्ये तुम्ही बाहेर पडताना सकाळी घरातून नाश्ता करून बाहेर जा. म्हणजे तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहील. बाहेर उन्हामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा कमी होते. परंतु तुम्ही जर पोटभर नाष्टा केला असेल तर तुमच्यात उत्साह राहील. (How To Stay Healthy In Summer)

सतत पाणी प्या

उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे डीहायड्रेशनचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्याला चक्कर येणे. यांसारखे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी पाणी पिणे खूप गरजेचे असते. शरीरात जर पाण्याची कमतरता कमी झाली तर अचानक चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या होणे यांसारखे प्रकार घडतात. त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्ही जलजीरा पाणी, नारळ पाणी तसेच इतर पदार्थ देखील होऊ शकतात.

ज्यूसचे सेवन करा | How To Stay Healthy In Summer

तुम्ही जर बाहेर जात असाल आणि तुमचे काम सतत उन्हात असेल, तर अशावेळी तुम्ही सतत रस पिला पाहिजे. संत्र्याचा रस, काकडीचा, टोमॅटोचा तसेच उसाचा रस वगैरे तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील आणि थंड राहील.

मसालेदार पदार्थांपासून लांब रहा

मसालेदार पदार्थांमध्ये जास्त ऊर्जा असते. उन्हाळ्यामध्ये तुमचे शरीरात खूप ऊर्जा असते. खूप उष्णता असते त्यात मसालेदार पदार्थ खाल्ले की, या उष्णतेमध्ये भर पडते आणि ह्यामुळे तुम्हाला मुरूम, उलट्या यांचा अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे यांसारख्या पदार्थांपासून उन्हाळ्यात लांब रहा.

जास्त थंड पाणी पिऊ नका

बरेच वेळा अनेक लोक थंडगार पाणी पितात किंवा त्यात बर्फ टाकून पितात. परंतु जर तुम्ही जास्त थंड पाणी पिले तर ते जास्त पाणी तुम्ही पिऊ शकणार नाही. तुमच्या शरीराचे तापमान वाढलेले असतील त्यात तुम्ही खूप जास्त थंड पाणी पिले तर त्याचे वेगळे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हलकेसे थंड पाणी.

उन्हातून घरी आल्यावर लगेच आंघोळ करणे टाळा

अनेक लोक बाहेरून आल्यावर आंघोळ करतात. परंतु आपल्या शरीराचे तापमान जास्त असते. आणि त्यावेळी आपल्या शरीरावर जर थंड पाणी पडले. तसेच तापमान बिघडते आणि सर्दी खोकला डोकेदुखी यांसारख्या आजारांना आपल्याला सामोरे जाऊ शकते. त्यामुळे बाहेरून आले आले लगेच थंड पाण्याने अंघोळ करणे टाळा.