“सर, पण UPSC/MPSC चा अभ्यास नेमका करायचा कसा…?”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 28 | -नितिन बऱ्हाटे

  कोणती पुस्तके वाचावी? कुठे क्लास लावावा?स्पर्धा किती मोठी आहे?हे सगळे जण सांगतात पण अभ्यास कसा करायचा ?? हे कोणी सांगत नाही, सदर लेखात आपला अभ्यास आणि अभ्यासपद्धती शोधण्याचे काही मार्ग पाहु ज्यामुळे स्पर्धापरीक्षेतील अथांग सागरात योग्य दिशेने मार्गक्रमण करताना येईल, आणि वाया जाणारा वेळही वाचेल

  परीक्षाकेंद्रीत – जी परीक्षा द्यायची आहे ती उत्तीर्ण होण्याचा फोकस ठेवुनच अभ्यास करायला पाहिजे, स्पर्धापरीक्षेत ज्ञानार्थी असण्यापेक्षा परीक्षार्थी असणे आवश्यक आहे.‌ परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्ञानार्थीपासुन परीक्षार्थी पर्यंतंचा वास्तविक प्रवास ठरवतात

  संकल्पनात्मक/तथ्यात्मक परीक्षेची गरज- आपण देणारया परीक्षेचा संक्लपनावर भर अधिक आहे की तथ्यांवर हे ओळखून काम केले पाहिजे उदाहरणार्थ तुलनात्मक दृष्ट्या MPSC मध्ये तथ्यावर आणि UPSC संकल्पना विश्लेषण वर भर‌ अधिक असतो. तसेच दोन्हीं बाजुचा पक्का अभ्यास असेल तर आपण सगळीकडे सहजतेने तग धरू शकतो. आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे समजुन घेतले पाहिजे

  स्मार्ट ट्रॅक – प्रत्येक परीक्षेचा एक स्मार्ट ट्रॅक असतो तो आपल्याला शोधता आला पाहिजे, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका, यशस्वी अधिकारी व तज्ञ आपल्याला तो स्मार्ट ट्रॅक शोधुन देऊ शकतात. नुसतेच हार्ड वर्क येथे चालणार नाही. आपल्या कल्पक अभ्याससाधनेतुन तो शोधुन काढला पाहिजे त्यासाठी परीक्षा आणि स्वतःला बारकाईने समजुन घेतले पाहिजे.

  Every day- success lies here, तुमच्या दैनंदिन वेळापत्रकामध्येच स्पर्धापरीक्षेचे यश दडलेले असते, वर्षभर सातत्याने दररोज केलेला अभ्यासच पद मिळवुन देतो. पुर्व आणि मुख्य परिक्षेच्या वेळेनुसार अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे. एकदा वाचुन संपवायचे आणि दैनंदिन उजळणीचे घटक यामध्ये समसमान वाटणी करून वेळापत्रक बनविले पाहिजे उदा MPSC साठी चालु घडामोडी, गणित, भाषा व्याकरण इ. घटक दररोज केल्यास पक्के होतात.

  दररोज सुखाची झोप आणि महीनाखेर पार्टी – दिवसभर वाचलेले रात्री उजळणी केल्यावर लक्षात आले पाहिजे, दररोज अभ्यासातुन एक एक मार्क गोळा करीत आत्मविश्वास ‌वाढवित गेलं पाहिजे, आठवड्यातुन एकदा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी किंवा विस्तृत लेखनाचा पेपर सोडवुन बघितला पाहिजे पुढे जाताना काही तरी संकल्पना/तथ्य समजुन घेतल्याचे समाधान नेले पाहिजे नाहीतर पुस्तकांची पाने पलटतायत, दिवसामागुन दिवस जातायत आणि पदरी काही पडत नसेल तर स्वतःचे मनोरंजन केल्या सारखे होईल, दररोजच्या अभ्यासाने सुखाची झोप आणि महीनाखेरची पार्टी करता आली पाहिजे.ताण घेऊन केलेला अभ्यास, अभ्यास असु शकत नाही

  सातत्य- अवघड आणि न समजणाऱ्या संकल्पना/तथ्य जास्त वेळ देऊन केल्या पाहिजेत, सोप्या आणि समजणाऱ्या संक्लपना/तथ्य उजळणी करीत रहायला हवं, स्पर्धा परीक्षा एक-सहा महीन्याची परीक्षा नाही यात दररोज सातत्य ठेवुन अभ्यास आणि आपल्यातले बारकावे शोधत काम करीत राहीले पाहिजे

  समतोल- स्पर्धापरीक्षा ही समतोल साधण्याची परीक्षा आहे, पुर्वचा क्वालिफायिंग पुरता अभ्यास अपेक्षित आहे तर मुख्य चा मेरीट एवढा आहे. पुर्व , मुख्य व मुलाखत या तिन्ही पातळ्यांवरच्या अपेक्षांचा समतोल साधता आला म्हणजे झालं. विषयानुसार ही प्रत्येक विषयाचा इनपुट आउटपुट चे गुणोत्तराचा अंदाज बांधुन तयारी करायला पाहिजे उदाहरणार्थ. UPSC पुर्व मध्ये कला आणि संस्कृती चे अभ्यास कीचकट आहे आणि त्याचे परीक्षेतील उत्पादीत गुणोत्तर तुलनेने कमी आहे याउलट भुगोल, अर्थव्यवस्था, चालु घडामोडी, राज्यशास्त्र यांचे गुणोत्तर चांगले आहे तर त्यावर अधिक लक्ष दिले पाहिजे.

  सीमा – विषयानुसार ठराविक प्रमाणित पुस्तके, अभ्यासक्रम, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि चालु घडामोडी या सीमांच्या चौकटीतच अभ्यास केल्यास अभ्यास भरकटत नाही . त्यामुळे ‌स्पर्धापरीक्षेचा अभ्यास आवाक्यात येतो.

  अद्ययावत(सक्रिय/सजग)- परीक्षांचा बदलता ट्रेंड, प्रश्र्न विचारण्याची पद्धती, प्रकार आणि संबंधित पदाची गरज आपल्याला समजुन घेता आली पाहिजे त्यासाठी आपण अद्ययावत असणे आवश्यक आहे उदा. UPSC मध्ये चालु घडामोडीला विशेष महत्त्व आहे वर्षभर चालु घडामोडीबाबत सक्रिय असणे अनिवार्य आहे

  उजळणी आणि सराव‌ – स्पर्धापरीक्षेचा अभ्यास थोडा पण पक्का असला तरी चालेल पण जे केलंय ते उत्तम असल्याचा आत्मविश्वास असावा हा आत्मविश्वास उजळणी आणि उजळणीच्या सरावानेच येतो. स्पर्धापरीक्षा ही जेवढे सातत्यपूर्ण मेहनतीची आहे तेवढीच आत्मविश्वासाची आहे. उजळणी साठी 45-1-7-3 हा नियम ठेवता येईल वाचलेला घटक दर 45 मिनीटानंतर, दिवसभराचा1 अभ्यास संपल्यानंतर, आठवड्यच्या 7शेवटच्या दिवशी, आणि महीन्याचे शेवटचे 3 दिवस उजळीसाठी ठेवले तर केलेला अभ्यास खुपचं प्राॅड्क्टीव्ह होतो.

  सारांश- आपल्याला समजलेली संक्लपना एकाचवेळी दोन शब्द किंवा 60 शब्दात मांडता येत असेल तर ती संकल्पना आपल्याला चांगली समजली असे म्हणता येईल. असे एक एक संक्लपना आपण समजुन घेत पुढे गेलो तर आपल्याला संबंधित विषय खुप चांगला समजला असं म्हणता येईल,मग परीक्षेत कितीही किचकट प्रश्न असले तरी चटकण सुटतील. अशा प्रकारे संपुर्ण अभ्यासाचा सुक्ष्म आणि स्थुल अवलोकन आपल्याला करता आले तर स्पर्धा परीक्षेचा गड सहजतेने सर करता येईल आणि पद विजयाची पताका थाटात मिरवता येईल.

  अभ्यास कसा करायचा ?? याचे एक ओळीत उत्तर म्हणजे “तुम्ही केलेल्या अभ्यासावर सोडलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये 60-70% अचुकता येत असेल तर अभ्यास बरोबर दिशेने चालु आहे.”

  #बाकी_राहुल द्रविड म्हणतात “There are unique million ways to get succeed in life” तसंच स्पर्धापरिक्षेमध्ये तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही युनिक अभ्यास पद्वतीने जर प्रश्नपत्रिकामधील प्रश्न सुटत असतील तर तुम्ही स्पर्धापरीक्षेत नक्की यशस्वी व्हाल”

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

तुम्ही MPSC चा अभ्यास करत असाल तर खालील लेख वाचायला अजिबात विसरू नका.

खुशखबर! MPSC च्या पदसंख्येत वाढ

राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहीरात आली…! आता काय…?

“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा……”

MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा

“2019 MPSC पुर्व परिक्षेतील CSAT ची तयारी कशी करावी ….??”

इतर महत्वाचे –

भाग १ – स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख

भाग २ – UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा

भाग 3 – स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट

भाग ४ – तर मग UPSC /MPSC करू नका ???

भाग ५ – UPSC/MPSC का करावी ???

भाग ६ – महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण

भाग ७ – मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच

भाग ८ – निबंधाचे तत्वज्ञान UPSC 2018

भाग 9 – कनेक्टिंग द डाॅटस् …UPSC Mains 2018

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?

 

Leave a Comment