हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अशी अनेक लोकं आहेत जे LIC ची पॉलिसी तर घेतात मात्र काही कारणास्तव त्यांना ती पुढे चालू ठेवता येत नाही. पॉलिसी अशी मध्यातच बंद करण्याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हणतात. आता यामध्ये असा प्रश्न उभा राहतो की पॉलिसी किती दिवसांनी कशी सरेंडर करता येते. हे जाणून घ्या कि, किमान 3 वर्षानंतरच पॉलिसी सरेंडर करता येईल जर त्याआधीच पॉलिसी सरेंडर केली तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत.
एकदा पॉलिसी सरेंडर केली तर एलआयसीच्या नियमांनुसारच सरेंडरची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच जर आपण पॉलिसी बंद करण्याचा किंवा LIC मधून पैसे काढण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या किंमतीएवढीच रक्कम परत मिळते ज्याला सरेंडर व्हॅल्यू असे म्हणतात. जर आपण पूर्ण 3 वर्षांसाठी प्रीमियम भरला असेल तरच सरेंडर व्हॅल्यू मिळू शकेल.
किती पैसे परत मिळतील ???
इथे हे लक्षात घ्या कि, पॉलिसी सरेंडर केल्यामुळे जास्त नुकसान होते. जर आपण सलग 3 वर्षे प्रीमियम भरला तरच आपल्याला सरेंडर व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर आपल्याला भरलेल्या प्रीमियमच्या फक्त 30 टक्केच रक्कम मिळेल मात्र पहिल्या वर्षाचा प्रीमियम वगळून. म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षी भरलेला प्रीमियम देखील शून्य होतो. अशा प्रकारे, उर्वरित दोन वर्षांसाठीची फक्त 30 टक्के रक्कमच मिळेल. यात रायडर्ससाठी भरलेले कोणतेही अतिरिक्त प्रीमियम, टॅक्स आणि LIC कडून मिळालेला कोणताही बोनस समाविष्ट नाही.
हे जाणून घ्या कि, पॉलिसी सरेंडर करण्यासाठी LIC सरेंडर फॉर्म आणि NEFT फॉर्म देखील लागेल. तसेच या फॉर्म्ससोबत आपल्याला पॅन कार्डची आणि मूळ पॉलिसी कागदपत्रांची कॉपी जोडावी लागेल. यासोबतच आपण पॉलिसी का बंद करत आहात हे देखील स्पष्ट करावे लागेल.
पॉलिसी सरेंडर करण्यासाठी कोणती कागदपत्रे द्यावी लागेल…
1. मूळ पॉलिसी बाँड डॉक्युमेंट्स
2. एलआयसी पॉलिसी सरेंडर फॉर्म नंबर 5074. (फॉर्म डाउनलोड केला जाऊ शकतो).
3. बँक अकाउंट डिटेल्स
4. LIC चा NEFT फॉर्म (जर तुम्ही सरेंडर फॉर्म वापरत नसाल).
5. मूळ ओळखपत्र जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/
हे पण वाचा :
Business Ideas : मोबाईल-लॅपटॉप रिपेअर सेंटरद्वारे कमवा लाखो रुपये !!!
SIP : 500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या
LPG गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे नवीन दर पहा
Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!