औरंगाबाद – नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणे जवळपास भरली असल्याने जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र यात आता मोठी घट झाली आहे. त्यामुळे जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. मात्र तरी देखील धरणाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहचला आहे.
पावसाने विश्रांती घेतल्याने गुरूवारी दुपार नंतर अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग जवळपास बंद करण्यात आले ओझर वेअर मधून केवळ ४५७ क्युसेस असा नाममात्र विसर्ग प्रवरेत सुरू होता. यामुळे प्रवरेतून जायकवाडी धरणात नाममात्र आवक दाखल होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून देखील विसर्ग घटविण्यात आले असून नांदुरमधमेश्वर वेअर मधून जायकवाडी साठी गोदावरी पात्रात केवळ १६१४ क्युसेस असा नाममात्र विसर्ग ठेवण्यात आला आहे. यामुळे जायकवाडी धरणात येणारा येवा कमी होणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.
गुरुवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५१५.९३ फूट झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी सहा फूट रिकामे आहे. धरणात एकूण जलसाठा २२४४.६६ दलघमी ( ७९.२६ टिएमसी ) तर उपयुक्त जलसाठा १५०६.६६ दलघमी ( ५३.२० टिएमसी) ईतका झाला आहे.