हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून दुपारी 1 वाजता विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. पण जर आपणास आपला निकाल दिसत नसेल तर त्यासाठी बोर्डाने हेल्पलाईन नंबर दिले आहेत. त्यावर आपण संपर्क करून आपला निकाल जाणून घेऊ शकता.
निकाल पाहताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा
1) 020-25705203
2) 020-25705204
3) 020-25705207
4) 020-25705208
5) 020-25705151
बोर्डाची अधिकृत वेबसाईट-
w.w.w.hscresult.mkcl.org
w.w.w.Mahresult.nic.in
दरम्यान, बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकावला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 90.91 टक्के लागला आहे.
यंदा देखील पुन्हा एकदा मुलांपेक्षा मुलींनीच निकालात बाजी मारली आहे.यंदा 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. याचाच अर्थ मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली पास झाल्या आहेत.