बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ३ एप्रिलपासून हॉल तिकीट

HSC studant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनमुळे शिक्षण विभागात विध्यार्थ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) येत्या 3 एप्रिलपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येणार आहे. राज्य मंडळा तर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल पासून सुरू केल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून द्यायची आहे.

विद्यार्थ्यांनी या प्रिंट आउटवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का घ्यावी. हॉल तिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे हॉल तिकीट वरील फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास त्याला पुनश्च प्रिंटआउट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन हॉल तिकीट द्यायचे आहे.

फोटो सदस्य असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून द्यायची आहे. विद्यार्थ्यांनी या प्रिंट आउटवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का घ्यावी.