हुबळी स्टेशनवर स्फोट; संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचे नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात तरुण गंभीर जखमी झालाय. इथं सापडलेल्या संशयित पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेना आमदाराचं नाव आढळल्यान एकच खळबळ उडाली. पार्सलवर नाव असलेले प्रकाश आबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत.

या स्फोटात जखमी झालेल्या तरुणाचं नाव हुसेनसाब नईवाले असं आहे. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळ मोठा अनर्थ टळला. जखमी हुसेनसाब ला तातडीने किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्टेशनवर आलेल्या एका पार्सलमधील संशयित वस्तूच्या माध्यमातून हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटात हुसेनसाबच्या हाताला जखम झालीये. तर केबिनच्या काचांचा चक्काचूर झालाय. काचेचे तुकडे स्थानकावर पसरल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशा प्रकारचं पार्सल प्रकाश आबिटकर यांच्या नावे आल्याची माहिती आहे. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आलीये. पोलिसांच्या शोध मोहिमेत आणखी आठ स्फोटक वस्तू आढळून आल्या. स्फोटाच्या आवाजामुळे रेल्वे स्थानकावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. रेल्वे पोलिस आणि शहर पोलिसांनी तातडीन रेल्वे स्थानकावर धाव घेतली. बॉम्ब शोधक पथक आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं होतं. रेल्वे स्थानकाला पोलिसांनी वेढा घालून व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे.

Leave a Comment