भारताच्या गहू निर्यातीत मोठी झेप, 2022 मध्ये गव्हाची विक्रमी निर्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धामुळे 2022 या आर्थिक वर्षात भारताच्या गहू निर्यातीत मोठी झेप घेतली आहे. जागतिक बाजारपेठेत कमी पुरवठ्यामुळे गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय गव्हाच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. आता ते देशही भारताकडून गहू घेण्यासाठी चर्चा करत आहेत, ज्यांनी यापूर्वी कधीही भारताकडून गहू घेतला नव्हता.

भारताने मार्च 2022 पर्यंत 7.85 मिलियन टन गहू निर्यात केला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील 2.1 मिलियन निर्यातीपेक्षा हे खूप जास्त आहे. भारत शेजारील बांगलादेशसह अनेक देशांमध्ये गहू निर्यात करत असल्याचे गहू व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातही गव्हाच्या निर्यातीतील ही तेजी कायम राहण्याची अपेक्षा आहे. बांगलादेश व्यतिरिक्त, भारताने दक्षिण कोरिया, श्रीलंका, ओमान आणि कतारसह इतर अनेक देशांमध्ये गहू निर्यात केला आहे. भारताने सर्वाधिक गहू 225 ते 335 डॉलर प्रति टन या दराने विकला आहे.

नवी दिल्लीतील प्रमुख गहू व्यापारी राजेश पहाडिया जैन यांनी लाइव्ह मिंटला सांगितले की,” गव्हाची निर्यात वाढत आहे. मुंद्रा आणि कांडला बंदरांवर गव्हाच्या मालाची मोठी वर्दळ असते. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे दोन्ही देशांतून येणारा गव्हाचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन मिळून 29 टक्के गव्हाची निर्यात करतात.”

इजिप्तलाही भारतीय गहू खरेदी करायचा आहे
गव्हाच्या निर्यातीबाबत भारतातील सर्वात मोठा गहू आयातदार इजिप्तसोबत वाटाघाटी सुरू आहेत. विशेष म्हणजे इजिप्त हा जगातील सर्वात मोठा गव्हाचा आयातदार देश आहे. पूर्वी तो रशिया आणि युक्रेनकडून गहू खरेदी करत असे. मात्र, युद्धामुळे आता तेथून गव्हाचा पुरवठा होत नाही.

याशिवाय चीन, तुर्की, बोस्निया, सुदान, नायजेरिया आणि इराण हे देशही भारताकडून गहू घेण्यास इच्छुक आहेत. लाइव्ह मिंटच्या रिपोर्ट्स नुसार, भारताच्या गव्हाची निर्यात अवघ्या 10 महिन्यांत चार पटीने वाढली आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर बदललेल्या जागतिक परिस्थितीत भारताला आफ्रिका आणि मध्य पूर्व प्रदेशातही गहू निर्यातीसाठी नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment