मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणूक निकाल हाती आल्यापासून शिवसेना नेते संजय राऊत यांचे नेहमीप्रमाणे ट्विटर वरून ‘बाण’ सोडणे चालूच आहे. आज सकाळीदेखील त्यांनी पंचवीस वर्षे सोबत असलेल्या भाजपला हिंदी मधील प्रसिद्ध शायरी द्वारे जोरदार टोला लगावला आहे.
संजय राऊत आपल्या ट्विट मध्ये म्हणतात , ” हम बुरेही ही ठीक हैं , जब अच्छे थे तब कोनसा मेडल मिल गया था…!”. मागील देशाच्या व राज्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपामध्ये अनेक तडजोडी करून त्यांनी पाच वर्षांचा संसार केला. मात्र, एवढा चांगुलपणा दाखवूनही शिवसेनेच्या वाट्याला काहीही आले नाही. त्यामुळे राऊत म्हणतात , कि आम्ही वाईट आहोत हेच ठीक आहे. कारण जेव्हा चांगले होतो तेव्हा आम्हाला विशेष असं काही मिळाले नाही.
मुख्यमंत्री पदावर ठाम असलेल्या शिवसेनाला भाजपने मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिल्याने शिवसेना आणि भाजप यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन आता सत्ता समीकरणे हे शिवसेना- राष्ट्रवादी-काँग्रेस अशी निर्माण होण्याची शक्यता तयार झाली आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2019