नाशिक प्रतिनिधी । मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे आपल्याला लहानपणापासूनच सांगितल जातं. मात्र तरीदेखील अनेकांना याचा विसर पडलेला दिसून येतो. मतदाना दिवशी सुट्टी असल्यानं अनेकजण पिकनिकचा प्लॅन करुन बाहेर जातात आणि मतदान करणे टाळतात. मात्र काहीजण कठीण परिस्थितीतही आपला मतदानाचा हक्क बजावतात. नाशिकच्या गवळाने गावात राहणाऱ्या १०२ वर्षांच्या सखुबाई नामदेव चुंबळे मात्र प्रत्येक निवडणुकीत आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन जात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या तीन पिढ्यांना बरोबर नेत आज देखील मतदान केलं. आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या करून दिला.
जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, लोकसभा यासह आजवरच्या तब्बल १४ वेळच्या विधानसभा निवडणुकीत आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय शिर्डीतील १०६ वर्षे वय असणा-या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. छबुबाई भगिरथ कु-हे असं त्यांच नाव असून त्यांनी श्रीरामपूर मतदार संघातील बेलापूर गावात मतदानाचा हक्क बजावलाय. याप्रकारे परिस्थिती, आरोग्य आणि वय या सर्वांचा विचार न करता प्रत्येकानं मतदानाचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. तसचं मतदान हे आपल राष्ट्रीय कर्तव्य आहे. याची देखील जाणीव प्रत्येकानं ठेवायला हवी. हेच या दोन उदाहरणातून समोर येतं.