हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज वटसावित्रीचा सण. या दिवशी आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून वट पौर्णिमेला महिलांकडून वडाची पूजा केली जाते. मात्र, हीच सावित्री पुढचे सात जन्म मला मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावे म्हणून तिच्या नवरोबांनी वडाची पूजा केली असल्याची घटना पिंपरी-चिंचवड मध्ये घडली आहे. या ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाला काही सत्यवानांनी आपल्या सावित्रीसाठी वडाची पूजा करत फेरेही मारले आहेत.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडच्या सांगवी परिसरात आज अनोखी वट सावित्रीची पूजा पार पडली. या ठिकाणी सावित्री म्हणजे महिलांनी वडाची पूजा करण्याऐवजी त्यांच्या पतीराजांनी उपस्थित राहत पूजा केली. या ठिकाणी मानव हक्क समितीच्या वतीन या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सांगवी गावात सावित्री ऐवजी अनेक सत्यवान वडाची पूजा करताना दिसले.
आपल्या पतीला वटवृक्षाप्रमाण दीर्घायुष्य लाभावे आणि सात जन्मी हाच नवरा मिळावा यासाठी प्रत्येक महिला वटसावित्रीची पूजा करते. मात्र, या आधुनिक युगामध्ये स्त्री-पुरुष समानता मानत पुरुषांकडून प्रत्येक जन्मी हीच पत्नी लाभावी, तिलाही दिर्घायुष्य लाभावे, यासाठी वडाची पूजा करण्यात आली. पुरुषांनी वडाची पूजा केल्याने महिला वर्गातून पुरुषांच्या या उपक्रमाच कौतुक होत आहे.