बारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लैंगिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पतीने पत्नीला जबरदस्तीने इतर सात ते आठ जणांशी शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेच्या पतीसह अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहुल प्रमोद गावडे, अरबाज आझीम इनामदार, फैजल दिलावर इनामदार, गणेश ईश्वर अवघडे व इतर अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपीविरोधात बलात्काराचा, तर फिर्यादीच्या पतीविरोधात तिला जबरदस्तीने हे कृत्य करायला भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींपैकी गावडे, अरबाज इनामदार व फैजल इनामदार व गणेश अवघडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. हि घटना सन 2017 ते जुलै 2021 या कालावधीमध्ये घडली आहे.
हि पीडित महिला शहरानजीक फलटण रस्त्यावर राहते. या महिलेचा पती लैंगिकदृष्ट्या दुर्बल आहे. तिने इतरांशी संबंध ठेवावेत, यासाठी पतीकडून दबाव टाकला जात होता. पीडितेच्या मोबाईलवरून तो मित्रांना मेसेज करून घरी बोलावून घ्यायचा. पत्नीने विरोध केल्यास तो तिला जीवे मारण्याची धमकी देत होता. यासंबंधी पीडितेने 9 डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दाखल केली.