कोलकाता : वृत्तसंस्था – कोलकातामध्ये एक अजब प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या पतीची परवानगी न घेता नवा मोबाईल खरेदी केला. या गोष्टीचा पतीला राग आला त्यामुळे त्याने थेट पत्नीच्या हत्येचीच सुपारी दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी पतीची मोबाईल खरेदी करण्याची इच्छा नव्हती मात्र पत्नीने त्याला न विचारता मोबाईल खरेदी केल्याने तो भडकला आणि त्याने पत्नीच्या हत्येची सुपारी दिली.
काय आहे नेमके प्रकरण ?
हि धक्कादायक घटना कोलकाताच्या नरेंद्रपूर या परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आणि सुपारी किलर या दोघांना अटक केली आहे. पीडित महिलेने काही महिन्यांपूर्वीच आपल्या पतीजवळ आपल्याला मोबाईल खरेदी कऱण्याची इच्छा आहे. मात्र आरोपी पतीने फोन घेऊन देण्यास नकार दिला. यानंतर या महिलेने स्वतःच फोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या महिलेने लहान मुलांचे ट्यूशन घेऊन पैसे जमा केले आणि एक नवीन फोन खरेदी केला.
या महिलेने फोन खरेदी केल्याचे तिच्या पतीला समजताच तो रागावला आणि त्याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पत्नीच्या हत्येची सुपारीसुद्धा दिली. यासाठी आरोपी पतीने एका किलरला पैसेदेखील दिले होते. यानंतर या किलरने त्या व्यक्तीच्या पत्नीवर हल्ला केला. या महिलेवर घटनेच्या दिवशी दोन अज्ञातांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. मात्र, सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसानी या प्रकरणी हल्ला कऱणारा व्यक्ती आणि महिलेच्या पतीला अटक केली आहे तर अजून एकजण फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.