धक्कादायक ! पत्नीने स्वयंपाक केला नाही म्हणून पतीने डोक्यात दगड घालून केली हत्या

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – पत्नीने स्वयंपाक न केल्यामुळे पतीने रागाच्या भरात डोक्यात दगडाने वार करत तिची हत्या केली आहे. स्वयंपाकाच्या मुद्द्यावरून पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर राग अनावर झालेल्या पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केली. ही घटना जबलपूरमध्ये घडली आहे. पप्पू गढवाल आणि शालिनी हे दोघं अनेक वर्षांपासून एकत्र राहत होते. काही दिवासांपूर्वीच दोघांनी लग्न केलं होतं. मात्र त्यानंतर वारंवार छोट्या मोठ्या काऱणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती.

काही दिवसांपूर्वी शालिनीने स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. हे भांडण एवढे टोकाला गेले कि पप्पूने डोक्यात दगडाने वार करून शालिनीची हत्या केली. यानंतर शालिनीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पप्पूने तिथून पळ काढला. त्यानंतर काही वेळातच शालिनीचा मृत्यू झाला. शालिनी घरात मरून पडल्याचे समजताच शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवले. डोक्यात वार झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी चौकशी केली असता शालिनी ही पप्पू नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

परिसरातील लोकांनी या दोघांना एकत्र जाता-येताना पहिले होते. यानंतर पोलिसांनी आरोपी पप्पूचा शोध घेऊन त्याला अटक केली. आपली पत्नी परवानगी न घेता वारंवार माहेरी जात असल्याचा राग पप्पूच्या डोक्यात असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झाले. यामळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. हा राग आरोपी पप्पूच्या मनात होता. यामुळे स्वयंपाकाच्या मुद्द्यावरून भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात आपण पत्नीची हत्या केल्याची कबुली पप्पूने दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.