संतापजनक! चटणी चांगली न बनवल्यानं पत्नीला अमानुष मारहाण; महिलेचा जागीच मृत्यू

murder
murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या आरोपी पतीने केवळ चटणी चांगली न बनवल्यामुळे आपल्या पत्नीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या दतिया या ठिकाणी घडली आहे.

आनंद गुप्ता नावाच्या एका व्यक्तीचं सामोसे आणि कचोरीचं एक दुकान होतं. दुकानात लागणारी चटणी आनंद गुप्ताची पत्नी घरीच बनवत असते. नेहमीप्रमाणं पत्नीनं रविवारी दुकानात लागणारी चटणी बनवली. यानंतर आनंदनं ही चटणी चाखून पाहिली. मात्र, चटणी चांगली झाली नसल्याचं सांगत आनंद यानं आपल्या पत्नीला मारहाण केली. यानंतर आनंदच्या आईने मध्ये पडून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राग अनावर झालेल्या आनंदने कोणाचेच न ऐकता आपल्या पत्नीला मारहाण करतच राहिला. या मारहाणीमध्येच या महिलेचा मृत्यू झाला.

यानंतर आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपी आनंद गुप्ता यानं घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आनंद फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी आनंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.