ट्रिपल तलाक दिल्यानंतर पतीने सोशल मीडियावर अश्लिल व्हिडीओ टाकल्याने पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुझफ्फरनगर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या २५ वर्षीय पत्नीला ट्रिपल तलाक देत तिच्याशी सगळे संबंध तोडले आहेत. यानंतर या पतीने तीन महिन्यानंतर या महिलेचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओची माहिती त्याचा पत्नीला समजताच तिला धक्काच बसला. यानंतर तिने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे.

ही घटना भोपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक चतुर्वेदी यांनी सांगितले कि, आरोपी आणि या महिलेचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक दीड वर्षांचा मुलगा आहे. आरोपीने सुमारे तीन महिन्यांपूर्वी ट्रिपल तलाक देऊन या महिलेशी असलेले नाते तोडसे होते. त्यानंतर सदर महिला मुलाला घेऊन आपल्या आई-वडिलांकडे राहायला गेली होती.

या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार या महिलेने पतीवर तीन तलाक दिल्याचा आणि मुलाला तिच्याकडून जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत असतानाच आरोपीने महिलेचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याचा धक्का बसल्यानंतर या महिलेने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली आहे.

Leave a Comment