पतीच्या अनैतिक संबंधाबद्दल समजल्यावर पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा मधील रायपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. पतीचे अनैतिक संबंध आणि सासरच्याकडून होणारा त्रास या सगळयांना कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. मृत महिलेचे नाव पल्लवी गणेश चव्हाण आहे तिने आपल्या 3 वर्षांच्या मुलीला जान्हवी गणेश चव्हाण हिला घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पती गणेश चव्हाण याचे बाहेर अनैतिक संबंध होते. यावरून गणेश आणि पल्लवी यांच्यात सतत वाद होत होते. यावरून गणेश तिला मारहाण देखील करत होता. तर पती,सासू, सासरे व ननंद हे तिला माहेरावरून शेतीचा वाटा आण यासाठी तिचा छळ करत होते. तिला मारहाण करून तिचा मानसिक आणि शारीरिक छळसुद्धा करत होते. या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

पल्लवी हिने आपल्या 3 वर्षांची मुलगी जान्हवी चव्हाण हिच्यासह गावाजवळील विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.