Hydroponics Technique | मातीशिवायही पिकवता येतो भाजीपाला, जाणून घ्या काय आहे नवी पद्धत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hydroponics Technique | आजकाल शेती करण्यासाठी अनेक नवनवीन तंत्र विकसित झालेले आहे. ज्या तंत्रांचा वापर करून शेतकरी शेती करत असतात. आणि वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेत असतात. कृषी तंत्र म्हणजे हायड्रोपोनिक्स. या तंत्रामध्ये झाडांना मातीशिवाय फक्त पाण्याद्वारे वाढवले जाते. पाण्यातूनच त्यांना पोषण दिले जाते. हे तंत्रज्ञान विविध प्रकारच्या पाण्यात पोषण नियंत्रित करताना वनस्पतींना योग्य प्रमाणात पोषण देते. या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर हा व्यवसायिक शेती आधुनिक घरगुती काम आणि विशेष भागांमध्ये देखील केला जातो.

या झाडांना योग्य प्रमाणात पोषण पाणी आणि वातावरण दिले जाते. त्याचप्रमाणे पाईप किंवा प्रवाहाच्या द्वारे त्यांना पोषकत्वे पुरवण्यासाठी पाणी दिले जाते. या वनस्पतींच्या मुळापर्यंत ऑक्सिजन वाहून दिला जातो. या हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर सामान्यतः भाज्या आणि फुलांच्या उत्पादनात केला जातो.

मातीशिवाय भाजी कशी वाढवायची

विक हायड्रोपोनिक सिस्टीम – यामध्ये धागा आणि स्कूलच्या माध्यमातून झाडांना पाणी आणि पोषक असणारी द्रव्य दिली जातात या सिस्टीम मध्ये खूपच कमी खर्च येतो.

प्रवाह प्रणाली – या हायड्रोपोनिक तंतात झाडे पाण्याच्या प्रवाहात उभी राहतात आणि पाण्यातच या वनस्पतींच्या वाढीसाठी असलेले सगळे घटक द्रव्य दिले जातात.

ठिबक प्रणाली –या प्रणालीमध्ये पाणी आणि पोषकतत्वे ही झाडांच्या खाली थेंब थेंब टाकले जातात आणि त्यातूनच त्यांना सगळे पोषण मिळते.

या तंत्रात गोष्टी लक्षात ठेवा | Hydroponics Technique

पोषण पद्धत: हायड्रोपोनिक्समध्ये (Hydroponics Technique) वनस्पतींचे पोषण करण्यासाठी एक प्रमुख पद्धत निश्चित करणे समाविष्ट आहे, जसे की निर्दिष्ट पाण्यात योग्य पोषक तत्वे जोडणे. प्रणाली डिझाइन: हायड्रोपोनिक्सच्या संदर्भात, वनस्पती ठेवण्यासाठी योग्य प्रणाली निवडणे महत्वाचे आहे. यामध्ये प्लास्टिकचे नेटपॉट किंवा इतर कोणत्याही साहित्य वापरले जाते

पाणी नियंत्रण: हायड्रोपोनिक्समध्ये पाण्याचे नियंत्रण खूप महत्वाचे आहे. पाण्याची गुणवत्ता, pH पातळी आणि पोषक घटकांचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे…

प्रक्रिया नियंत्रण: हायड्रोपोनिक्सच्या संदर्भात, तापमान, प्रकाश आणि हवेची गुणवत्ता देखील महत्त्वाची आहे.

उत्पन्न: विशिष्ट उत्पादनांसाठी विशेष उपाय केले जाऊ शकतात, जसे की वनस्पतींच्या वाढीकडे आणि विकासाच्या परिस्थितीकडे लक्ष देणे.