हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Hyundai लवकरच Hyundai Ioniq 5 हि कार भारतीय मार्केटमध्ये आणणार आहे. कोना इलेक्ट्रिकनंतर Hyundai कंपनीची हि दुसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे. कंपनीने हि कार भारतात लॉंच करण्यापूर्वी त्याचे टीझर रिलीज करण्यास सुरुवात केली आहे. या टीझरमध्ये कंपनीने कारच्या इंटीरियरची खासियत दाखवली आहे.
कशाप्रकारे असणार इलेक्ट्रिक कारचे इंटीरियर?
Ioniq 5 च्या पुढील भागात ‘प्रीमियम रिलैक्सेशन सीट’ उपलब्ध होणार आहेत. सीटला लंबर सपोर्ट आणि रिक्लाइन फंक्शनसह इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट मिळते. याशिवाय यात रिलॅक्स बटण देखील आहे. इतकेच नाही तर सीटला स्लिम डिझाईन मिळते, ज्यामुळे केबिनमध्ये जास्त जागा दिसते. मागील प्रवासी मागच्या बाजूला असलेल्या बटणाच्या साहाय्याने ड्रायव्हर सीट ऍडजेस करू शकतात.
20 डिसेंबरपासून बुकिंग सुरु
भारतात या कारच्या बुकिंगला 20 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये (hyundai) फुल चार्जमध्ये 480KM ची रेंज देण्याची क्षमता आहे. यामध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय दिले जाऊ शकतात. बॅटरी पॅक 350 kW DC फास्ट चार्जरद्वारे 18 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज केला जाऊ शकतो. या गाडीचे फीचर्स बघता या गाडीची सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे. आता भारतातील लोक या कारला कशाप्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट