जालना प्रतिनिधी । ‘मी असेपर्यंत खुशाल गायी कापा’ असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांचे प्रचार सभेतील एक भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असे वक्तव्य करताना ते दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात प्रचार करताना दानवे असं बोलले होते असे समजत आहे. या संदर्भातली एक व्हिडीओ क्लीपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे त्यासोबत कोणीतरी छेडछाड केली असावी असंही त्यांनी स्पष्ट केलं. १९ ऑक्टोबर रोजी रावसाहेब दानवे यांनी कठोरा बाजार या ठिकाणी मुस्लिम बांधवांची सभा घेतली. या सभेत रावसाहेब दानवे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केंद्र सरकारने गोहत्या बंदीचा कायद्याची देशभरात अंमलबजावणी केली. मात्र त्यांच्याच सरकारमधले मंत्री आता हे वक्तव्य करत आहेत.