हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालनने आतापर्यंत अनेक विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता पुन्हा एकदा एका नव्या आणि हटके भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस येण्याकरिता सज्ज झाली आहे. तिच्या धरणी या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून आता ती एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत आपल्या समोर येतेय. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यानंतर नुकतेच आता अमेझॉन प्राइम व्हिडीओने ‘मैं शेरनी’ हे दमदार गाणे प्रदर्शित केले आहे. यात विद्या बालनसह काही अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया आहेत. या गाण्याच्या माध्यमातून पारंपरिक समजुतींना मोडीत काढून विविध आव्हानांना सामोऱ्या जात आपले स्थान निर्माण करणाऱ्या स्त्रियांना सलाम केला आहे.
https://www.instagram.com/tv/CQIce3JH1yy/?utm_source=ig_web_copy_link
राघव यांनी लिहिलेले ‘मैं शेरनी’ या गाण्याला उत्कर्ष धोतेकर यांनी संगीत दिले आहे. तर या व्हिडीओमध्ये मिरा एर्डा (F4 रेसर – ड्रायव्हर कोच), नताशा नोएल (बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्ल्युएन्सर – योगा ट्रेनर), एश्ना कुट्टी (सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि हुला-हूप डान्सर) दिसत आहेत. तर यांच्याव्यतिरिक्त त्रिनेत्रा हलदार (कर्नाटक राज्यातील पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर), जयश्री माने (बी.वाय.एल नायर हॉस्पिटलमधील आघाडीची लढवय्यी), रिद्धी आर्या (आघाडीच्या लढवय्यांना पोटभर जेवण पुरवणारी विद्यार्थिनी), अनिता देवी (सुरक्षा रक्षक), सीमा दुग्गल (एक शिक्षिका), अर्चना जाधव (घरकाम करणारी आपली मावशी) यांच्यासोबत विद्या बालन या गाण्यात दिसणार आहे.
https://www.instagram.com/tv/CPm4ll2HOr6/?utm_source=ig_web_copy_link
विद्या बालनचा शेरनी हा चित्रपट येत्या १८ जून २०२१ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या गाण्याबाबत बोलताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, “कधीही हार न मानण्याची अमर्याद जिद्द बाळगणाऱ्या जगभरातील महिलांना आम्ही दिलेली सलामी म्हणजे मैं शेरनी हा म्युझिक व्हिडीओ. शेरनी आम्हा सर्वांसाठी फार खास आहे आणि हा चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओ यांच्या माध्यमातून आम्ही अशा महिलांना वंदन करतो ज्यांनी दाखवून दिले की महिला करू शकणार नाहीत असं काहीच नसतं. या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा विद्या विन्सेट… यातून आम्हाला दाखवायचं आहे की स्त्री निर्भय असते, ताकदवान असते. वाघीण असण्यासाठी डरकाळीच फोडायला हवी, असं नाही. अँथम बनलेल्या या गाण्यातून आम्ही हेच दाखवू पाहतोय.”