हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्यातच राज्यभर त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे डावलले जात आहे, असा आरोप मुंडे समर्थकांनी केला आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी हरले. मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी संपणार नाही. कारण तुम्ही आहात. मला सत्तेची लालसा नाही, कुठलीही अपेक्षा नाही. तुमच्या प्रेमाच्या ऋणात मी आहे. जनतेची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. कुठलंही पद मिळण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही. मला दबाबतंत्र करायचे असते तर या दबाबतंत्र करायला ही जागा पुरणार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी म्हंटल.
आपण बांधलेले घर का सोडायचे, असा सवाल पंकजा यांनी केला. मला जेव्हा वाटेल की आता यात राम नाही तेव्हा बघू असे त्या म्हणाल्या. माझे नेते मोदी, शहा, नड्डा आहेत केंद्रीय, राज्यात मंत्री नसले म्हणून काय झाले, मी राष्ट्रीय मंत्री आहे, असे म्हणत पंकजा यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत घातली.