हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्याची पाहणी केली. यावेळी म्हुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि महाराष्ट्रात मोठे संकट आले आहे. अशा संकटात त्यांना मदत करणे गरजेची आहे. ती करताना मी जनतेच्या जीवाशी खेळ करणार नाही. मी पॅकेज देणारा नसून मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे अशा टोला यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
कोल्हापुरातही महापुरामुळे नुकसान झाले असल्याने या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नुकसानीबाबत राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीबाबत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि, महापुरात नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत एकीकडे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे महापुराचे पाणी ओसरत असल्याने या ठिकाणी कोरोनासह इतर आजारही पसरण्याची भीती आहे.
त्यामुळे या ठिकाणी मदत देत असताना वेगवेगळ्या स्वरूपात मदत देणे आवश्यक आहे. एकीकडे घरांचे तसेच शेतीचे नुकसान तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. काल पूरग्रस्त व्यावसायिक, दुकानदारांना विमा रक्कम मिळण्यासंदर्भात विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले. त्यात “पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची 50 % रक्कम तातडीने द्यावी,”अशी विनंतीही केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांसाठी केल्या जात असलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, मी अजूनही नुकसानीची पाहणी करणार आहे. मोठ्या प्रमाणात महापुरामुळे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मी कोणत्याही स्वरूपाच्या आर्थिक पेकेजची घोषणा करणार नसून मी जनतेला मदत करणारा मुख्यमंत्री आहे केवळ आर्थिक पेकेजची घोषणा करणारा मुख्यमंत्री नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी फडणवीस यांना टोला लगावला.