सांगली | महापूर रोखण्यासाठी भिंती बांधा, बोगदा काढा परंतू आमच्या बुडाखाली आलेल्या पाण्याचं नियंत्रण करा. पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान दिल्याची बतावणी करू नका. ते पैसे कोणाच्या घरात गेले? गोरगरीबांची चेष्टा करताना लाज वाटत नाही का? सांगली व कोल्हापूर जिल्हयाच्या पालकमंत्र्यांनी काल्पनिक कथा रचून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करू नये. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी शासन निर्णय बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी महाविकास आघाडीचा घटक त्यांचा गुलाम नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
इस्लामपूर प्रांत कार्यालयावर पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. माजी आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पृथ्वीराज पवार, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपटराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजू शेट्टी म्हणाले, पूरग्रस्त शेतकर्यांच्या मागण्या आंदोलनापुर्वीच मागण्या मान्य झाल्या असत्या तर आनंद झाला असता. हुशार मंत्र्यांना मागण्या माहित कशा नाहीत? राज्य सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवून फसवू नये. सांगलीच्या बचावासाठी भिंत बांधली तर पावसाचे नदीला येणारे पाणी पुढे कुठे आडवणार, ते कोठे सोडणार? हे सांगावे. कृष्णा नदीवर बंधारे व पूलाच्या दोन्ही बाजूला असणारा भराव पूरासाठी कारणीभूत ठरत आहे त्यावर पर्याय काढा अशी मागणी त्यांनी यावेळी केल