‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड दाऊद असो, मी कुणाला घाबरत नाही! खासदार संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । ‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड असो, मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचं कुणी वाकडं करून शकत नाही’, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत बोलत होते. ‘मी दाऊद इब्राहिमला पाहिले असून, त्यांच्याशी बोललोय, इतकेच नाही त्याला मी दमही दिला आहे’, असा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी मुलाखती दरम्यान केला. गेल्या महिन्यापासून संजय राऊत यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. त्यावर ‘हिंमत असेल तर माझ्या अंगावर या’ असे सूचक उद्गारही त्यांनी मुलाखतीदरम्यान काढले.

‘लोक मला एकेकाळी गुंड म्हणत असत. चांगलं आहे. गुंड म्हणजे चांगलं काम करणारा माणूस. ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले याचा आम्हाला अभिमानच होता. मात्र, पुढे सगळं बदलत गेलं. नंतर चक्रं फिरली. ‘माझं ते माझं. तुझं ते माझ्या बापाचं’ हा राजकारणातील एक स्वभाव आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला हाणला.

शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं होत. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत संजय राऊत यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळं विरोधाक सारखे सध्याच्या सरकाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यावेळी संजय राऊत यांनी सरकार विषयी आपली भूमिका मांडली. ”शिवसेनेने हे सरकार असं आहे की, या सरकारला कुणी खिचडी म्हणत नाहीत. या सरकारला लोक सरकार म्हणतात. शरद पवार यांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं होते. पुलोदच्या त्या सरकारला लोक पुलोदची खिचडी म्हणायचे. तीन पक्षांचे सरकार असूनही लोक या सरकारला खिचडी म्हणत नाहीत. याचं कारण या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत आणि त्यांच्या पाठिशी शरद पवार आहेत,” असे राऊत म्हणाले. माझा शरद पवारांवर प्रचंड विश्वास असल्याचेही राऊत म्हणाले.

Leave a Comment