कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड | मी माझ्या विषयाशी एकनिष्ठ असतो, मग ती निवडणुक विधानसभा असो की लोकसभा. आज पदवीधरांचा प्रश्न ऐरणीकर आलेला आहे. अभिजीत बिचकुलेच्या रक्तामध्ये चहा आणि दुधाची मात्रा सापडत नाही, असे माझे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणतो. त्यामुळे दारू आणि व्यसनं माझ्यापासून दूर आहेत. महाराष्ट्राला नवी दिशा आणि दशा द्यायला मी तयार आहे. विधानभवनामध्ये माझ्यासारखा एक पूर्ण निरव्यसनी आमदार झाला तर नविन दशा आणि दिशा ठरवीन. ही दारू- मटणांची निवडणूक नाही. मला पर्याय शोधला तर तुम्ही पदवी घेवून काय उपयोग. महामंडळ जाती- धर्माच्या नावावर न करता सुशिक्षित बेरोजगार विकास असे मंडळ काढणार आहे. साताऱ्यात काय बाडगूळ म्हणतायत माझ्याबद्दल काय पडलंय. त्यांनाच जनतेने पाडलं असे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी साताऱ्यातील नेत्यांवर टीका केली.
कराड येथे पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या संदर्भात बोलत ते होते. अभिजीत बिचुकले म्हणाले, मी सांगतो शिवरायांचा वारस असा लागतो. शिवाजी महाराज कुणा एकाची देण नाही. वंशावर तुम्ही काय उड्या मारता. काही नाही चालत असलं, क्रम लागत. मी घरी फॅन लावून निवांत राहिलो असतो, चंपाला पुणेकर स्विकारतात, पुणे तिथे काय उणे, पुण्याच्या लोकांना माझा सॅल्युट. तुम्ही माझ्यावर प्रेम करता अभिमान बाळगता तर मला निवडूण द्या. छत्रपतीचे नांव घेतल्यानंतर का थांबता, त्याला नालायक शब्दही कमी पडतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी मला मते दिली तर पुणे मतदार संघातून अभिजीत बिचुकले विधानभवनात नक्कीच दिसेल अस ते म्हणाले.
अमेरिकेत वर्णभेदी असूनही ओबामा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात तर मी आमदार का होऊ शकत नाही असा सवाल देखील त्यांनी केला. चंपा ला पुण्याने स्वीकारले त्या पुणेकरांना माझा सॅल्युट अस ते म्हणाले.पदवीधाराना खरंच आता विचार करण्याची वेळ आली आहे. पदवीधर पुस्तकांमध्ये गेला असता तर गुटखा खाणार नाही, दारू पिणार नाही.आणि मी तर पूर्ण निर्व्यसनी आहे. हवं तर जगातील कोणतीही टेस्ट माझ्यावर करा अस जाहीर आव्हानही त्यांनी दिले. माझ्यासाठी समाज महत्वाचा नसून तरुण पिढी मला महत्त्वाची आहे. त्यामुळे या सर्वांनी विचार करून मतदान करावे आणि तुमचा हा अभिजित बिचुकले विधानसभेत महाराष्ट्राच्या सेवेसाठी सादर आहे असे अभिजित बिचुकले म्हणले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’