कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त काल कराड येथे शाहिद जवानांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांनी शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली.तसेच सातारा जिल्ह्यातील शाहिद जवानांच्या कुटुंबीयांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात खुर्च्या मोकळ्या दिसल्यामुळे उदयनराजे म्हणाले की, ‘आज इथे लावणीचा कार्यक्रम असता तर,लोकांना बसायला जागा पुरली नसती पण शाहिद जवानांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात या खुर्च्या रिकाम्या आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे.’ येथे जर बॉम्ब पडला तर सर्व जण पळत आले असते,पण कार्यक्रमाला कोणी आले नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘राज्य कर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सैनिकांच्या पदरी उपेक्षाच पडली आहे. तुमी एक दिवस सीमेवर जाऊन पहा म्हणजे समजेल सैनिकांचा त्याग आणि शौर्य काय असते.’ अशा कठोर शब्दात त्यांनी लोकांना ठणकावले. मी बॉर्डरवर जाऊन आल्यामुळे मला जवानांनाबद्दल आत्मीयता वाटते असे त्यांनी सांगितले. लोकांच्या सुरक्षेसाठी जवान सीमेवर जातात मात्र आपण यांचा सन्मान करत नाही. आज आपण सैनिकांमुळे सुरक्षित आहोत ही भावना मनात ठेऊन त्यांचा आदर केला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. मी सामान्य लोकांबरोबरच सैनिकांच्या पाठीशी देखील ठामपणे उभा आहे असे त्यांनी सांगितले. जवानांचे आत्मबल वाढविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले.
इतर महत्वाचे –
नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?
उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले