मी नाभिक समाजाची माफी मागतो : नरेंद्र पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मल्हारपेठ (ता. पाटण) येथे झालेल्या निष्ठा संवाद यात्रेच्या सभेत शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शंभूराज देसाई यांना ‘न्हावी’ म्हणल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. त्याचे पडसाद साताऱ्यात उमटू लागल्याने नरेंद्र पाटील यांनी नाभिक समाजाची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. अनावधानाने बोलण्याच्या ओघात नाभिक समाजाचा उल्लेख झाला असून वास्तविक माझा तसा बोलण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या. वीर जीवा महाले हे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या वंशजांच्या बद्दल आम्हाला आदरच आहे. व्यक्तिगत या समाजातील सर्वांबरोबर आमचे संबंध आहेत, असे सांगत शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे..

मल्हारपेठ (ता. पाटण) येथील आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेत नाभिक समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पाटण तालुका नाभिक संघटनेच्यावीने बुधवारी (दि.3) आपली दुकाने बंद ठेवून पाटण पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. नरेंद्र पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्रभर नाभिक समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड व जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी पाटणचे पोलिस निरीक्षक नितीन चौखंडे यांना निवेदनाद्वारे दिला होता.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेनिमित्त पाटण मतदारसंघात मल्हारपेठ येथे मंगळवारी जाहीर सभा झाली. या सभेमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी नाभिक समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद बुधवारी पाटणसह परिसरात उमटले. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी तात्काळ मी नाभिक समाजाची माफी मागतो, असे म्हटले आहे.