व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

तिघांचे घ्या, अन् चौथ्याला मतदान करा, आमदार रत्नाकर गुट्टेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

परभणी : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी हिंगोलीतल्या बबनराव थोरातांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याप्रकरणी त्यांना अटकसुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर आता परभणीतल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या (ratnakar gutte) एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशाच एका कार्यक्रमात आमदार रत्नाकर गुट्टे (ratnakar gutte) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. यंदाच्या निवडणुकीत समजा चार उमेदवार असतील तर तिघांचे (पैसे) घ्या आणि चौथ्याला मतदान करा, असे वादग्रस्त त्यांनी केले आहे. एवढंच नव्हे तर खर्च करणाऱ्या उमेदवारांनी हे पैसे काही मेहनतीने कमावलेले नसतात तर ते जनतेलाच लुटलेलं असतं असंसुद्धा ते म्हणाले.

रत्नाकर गुट्टे नेमके काय म्हणाले ?
निवडणुकांच्या तोंडावर आल्या असताना आता नेत्यांचे वादग्रस्त विधाने समोर येत आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे (ratnakar gutte) यांनी निवडणुकीत तिघांचे पैसे घ्या अन् चौथ्याला मतदान करा ,असे मतदारांना आवाहन करून एकच खळबळ उडवून दिली आहे. रत्नाकर गुट्टे (ratnakar gutte) मित्र मंडळात काही कार्यकर्त्यांचा प्रवेश होता त्यावेळी ते गंगाखेड येथे आयोजित सभेत बोलत होते. तसेच खर्च करणारे उमेदवार यांनी नांगर हाणून पैसे आणलेले नसतात. त्यांनी जनतेला लुटलेलच असते. त्यामुळे त्यांना आपल्याला लुटायला काय प्रॉब्लेम आहे असेदेखील ते यावेळी म्हणाले.

हिंगोलीच्या बबनराव थोरातांवर कारवाई
हिंगोली मतदार संघात शिवसेना नेते बबनराव थोरात यांनीदेखील काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली होती. गद्दारांच्या गाड्या फोडा. जो पहिली गाडी फोडेल, त्याचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी हिंगोलीतील एका कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर