कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
माझे कार्यकर्ते नसतात, मित्र असतात. कराड येथे माझ्या कार्यकर्त्यांनी नव्हे, विजय आणि राजेंद्र यादव या माझ्या मित्रांनी प्रेमाखातंर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. कराड असो की सातारा येथील पालिकेच्या राजकारणात मी कधीच हस्तक्षेप करीत नाही. केवळ विकासकामे व्हावीत एवढीच माझी इच्छा असते, प्रतिपादन श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
कराड- हजारमाची येथे छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीच्या मैदानाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. आनंदराव पाटील, राजेंद्रसिह यादव, हणमंतराव पवार, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव, माजी नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, स्मिताताई हुलवान, बाळासाहेब यादव, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, प्रीतम यादव, निशात ढेकळे, ओंकार मुळे, विनोद भोसले, राहुल खरडे तसेच कराड नगरपरिषद, सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते. छ. उदयनराजे म्हणाले, राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव मित्र परिवाराच्यावतीने महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेल्या या बैलगाड्या शर्यतीचे केलेले आयोजन शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. अशा स्पर्धामुळे बैलांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले असुन शेतकरी वर्गात उत्साह आला आहे.
https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/videos/857062338928258
श्रीमंत छ. खा. उदयनराजे यांचे कराडमधे आगमन झाल्यावर त्यांनी प्रथम शिवतिर्थावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर विजयसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली मोटारबाईक रॅलीने उदयनराजेंना शर्यतस्थळी नेले. यावेळी ठिकठिकाणी नागरीकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यामुळे श्रीमंत. छ. खा. उदयनराजे भारावुन गेले.