कसबा पोट निवडणुकीतील पराभवानंतर फडणवीसांची घोषणा ! Tweet करत म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात भाजपला पराभव पत्करावा लागला. भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी विजयी झाले. तर भाजपच्या हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव झाला. बालेकिल्ल्यात पराभव झाल्यामुळे भाजपवर टीका होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत घोषणा केली आहे.

भाजप नेत्याला पराभव पत्करावा लागल्यानंतर फडणवीसांनी ट्विट करत घोषणा केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, “कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!,”

दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 11 हजार 40 मतांनी पराभव केला. धंगेकर यांना 73 हजार 194, तर रासने यांना 62 हजार 244 मते मिळाली. भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात मुक्काम ठोकला. तरी देखील त्यांना धंगेकरांना रोखता आले नाही.