मुंबई । अभिनेत्री कंगना राणौत हिच्या पाली हिल येथील कार्यालयावर सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अचानक धाड टाकण्यात आली. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. यावेळी अधिकाऱ्यांनी इमारत प्रस्वात विभागाकडे असलेल्या आराखड्यानुसार कार्यालय आहे की त्यामध्ये अंतर्गत बदल केले आहेत? एफएसआयचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी केली. यापूर्वी कंगनाच्या कार्यालयाला एमआरटीपी नोटीस देण्यात आल्याचेही समजते. त्यामुळे आता या कार्यालयात अनधिकृत बदल आढळल्यास पालिका त्यावर कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
या सगळ्या घडामोडीनंतर कंगना राणौतने नेहमीप्रमाणे ट्विटसचा सपाटा लावून पालिकेवर निशाणा साधला. १५ वर्ष मेहनत करून मी मुंबईतील हे कार्यालय बांधले आहे. चित्रपट निर्माता झाल्यानंतर आपले एखादे कार्यालय असावे, हे माझे स्वप्न होते. मात्र, आता हे कार्यालय जमीनदोस्त होईल, असे वाटत आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने माझ्या कार्यालयात प्रवेश केला.
They have forcefully taken over my office measuring everything, also harassing my neighbors when they retorted @mybmc officials used language like ,” वो जो मैडम है उसकी करतूत का परिणाम सबको भरना होगा” I am informed tomorrow they are demolishing my property 🙂 pic.twitter.com/efUOGJDve1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 7, 2020
त्यांनी सगळ्या जागेचे मोजमाप घ्यायला सुरुवात केली. तसेच माझ्या शेजाऱ्यांनाही त्रास दिला जात आहे. तुमच्या मॅडमच्या कृतीचे परिणाम सगळ्यांना भोगायला लागणार, असे काही पालिका अधिकाऱ्यांनी म्हटल्याचा दावाही कंगनाने केला. तसेच हे कार्यालय उद्या पाडण्यात येईल, असेही मला कळवण्यात आल्याचे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.