बारामती प्रतिनिधी | बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात भाजपकडून कांचन कुल या लोकसभा निवडणूक लढणार आहेत. भाजपचा विजयी संकल्प मेळावा काल पार पडला यावेळी बोलताना कांचन कुल म्हणाल्या, आमचे गुरु गिरीश बापट, महागुरू नरेंद्र मोदी आहेत. मी मोदींच्या शाळेत शिकलेले असल्याने, त्यांचा विध्यार्थी कच्च कसा राहील.’ असा सवाल त्यांनी बारामती केला.
रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपचे तिकीट मिळाले असून त्या बारामतीतून लोकसभा लढणार आहेत. काल त्यांच्या पहिल्या सभेत त्यांनी तीन मिनिटांचे भाषण केले. यावेळी त्या म्हणाल्या, ‘तुम्हाला वाटते हा उमेदवार नवीन आहे, त्यांना कामाची काही माहिती नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी मोदींच्या शाळेत शिकले आहे, त्यांचा विद्यार्थी कच्चा कसा असेल ?’ असा सवाल आपल्या सभेत केला. त्यांच्या या सावलाने टाळायचं कडकडाट झाला.
भाजपच्या मेळाव्यात शिवसेना, भाजपचे नेते उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना विजय शिवतारे यांनी ‘सुप्रिया सुळे नुसत्या सेल्फी काढतात’ अशी टीका केली. तसेच ‘कांचनताई दिल्ली में,सेल्फीवाली बाई गल्ली में’ अशी मिश्किल टीका केली. मेळाव्यात शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोरे हजार होत्या यांनी मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.
इतर महत्वाचे –
केंद्रातील सरकार मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार सरकार – शरद पवार
डॉ.अतुल भोसले यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्धार
तासगाव बसस्थानकामध्ये तरुणांची रंग खेळत हुल्लडबाजी